द्रविडचा चिरंजीव चॅलेंजर स्पर्धेत खेळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हैदराबादमध्ये बुधवारपासून सुरू होणाऱ्या पुरूषांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील वनडे चॅलेंजर चषक क्रिकेट स्पर्धेत माजी प्रमुख प्रशिक्षक आणि कसोटीवीर राहुल द्रविड यांचा चिरंजीव अन्वय सहभागी होत आहे.
या स्पर्धेत एकूण चार संघांचा समावेश आहे. अन्वय द्रविड हा आघाडीच्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. त्याच्या संघाचा या स्पर्धेत क संघात समावेश झाला आहे. राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समीत याने महाराजा टी-20 केएससीए चषक स्पर्धेत आक्रमक फलंदाज म्हणून काही सामन्यांत आपला सहभाग दर्शविला होता. आगामी आयडीएफसी फर्स्ट बँक पुरस्कृत पुरूषांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील वनडे चॅलेंजर चषक क्रिकेट स्पर्धा 5 ते 11 नोव्हेंबर दरम्यान हैदराबादमध्ये खेळविली जाणार असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
क संघाचे नेतृत्व अॅरॉन जॉर्ज करीत आहेत. क संघाचा सलामीचा सामना ब संघाबरोबर शुक्रवारी होणार असून वेदांत त्रिवेदी हा ब संघाचा कर्णधार आहे. अ संघाचे नेतृत्व विहान मल्होत्राकडे सोपविण्यात आले असून या संघात अभिज्ञान कुंडू, वनीश आचार्य, बालाजी राव, आर. लक्ष्या, विनीत, मार्कंडेय पांचाळ, सात्विक देस्वाल, यशवीर, हेमचुडासेन, अंबरीश, प्रतापसिंग, वासु देवानी, गुहा आणि इशान सूद यांचा समावेश आहे.
ब संघाचे नेतृत्व वेदांत त्रिवेदी करत असून या संघात हरवंश सिंग, वाफी केचाची, सागर विर्क, सायन पॉल, वेदांत सिंग चौहान, प्रवण पंत, सालेरिया, बी. के. किशोर, अनमोलजित सिंग, नमन पुष्पक, डी. दीपेश, मोहम्मद मलिक, मोहम्मद सौदागर व वैभव शर्मा यांचा समावेश आहे.
क संघामध्ये अॅरॉन जॉर्ज, आर्यन यादव, अंकित चटर्जी, मणिकांत शिवानंद, राहुल कुमार, यश कासवनकर, अन्वय द्रवीड, युवराज गोहील, खिलान पटेल, अनिष्क चौहान, आयुष शुक्ला, हेनील पटेल, लक्ष्मण पृथी, रोहीतकुमार दास व मोहीत उल्वा यांचा सहभाग आहे.
ड संघाचे नेतृत्व चंद्रहास दास यांच्याकडे सोपविण्यात आले असून या संघात एम. चेवडा, शंतनु सिंग, अर्णव बुग्गा, अभिनव कानन, कुशाग्रह ओझा, आर्यन सकपाळ, रापोले, विकल्प तिवारी, मोहम्मद इनान, आयान अक्रम, उधव मोहन, अशुतोष माहीदा, तोशित यादव व सोलीब तारीक यांचा समावेश आहे.