कॅन्टोन्मेंटकडून नाल्याची स्वच्छता
स्वच्छता ही सेवा उपक्रम : रक्तदान शिबिराचे आयोजन
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डकडून स्वच्छता ही सेवा तसेच जनभागीदारी या उपक्रमांतर्गत नाल्याची स्वच्छता करण्यात आली. कॅन्टोन्मेंट परिसरातील शरकत पार्क येथील नाल्याला जलपर्णींनी वेढा घातला होता. त्या नाल्याची स्वच्छता कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांनी केली. या उपक्रमामध्ये सीईओ राजीवकुमार, साहाय्यक अभियंता सतीश मण्णूरकर, कार्यालयीन अधीक्षक एम. वाय. ताळूकर, डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. सुरेखा पाटील, प्रियांका पेटकर, एस. एम. कलाल, बसवराज गुडोडगी, शिवप्रसाद हरकुनी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
उद्या रक्तदान शिबिर
कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मंगळवार दि. 1 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हॉस्पिटलमध्ये शिबिर होणार आहे. यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे.