For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिनाब ब्रिजवर ड्रॅगनची वक्रदृष्टी

06:45 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिनाब ब्रिजवर ड्रॅगनची वक्रदृष्टी
Advertisement

पाकिस्तानच्या माध्यमातून करवितोय हेरगिरी : भारताबद्दल जळफळाट

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारताच्या विरोधात सातत्याने आगळीक करत असतात. आता चीनच्या निर्देशावर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय जम्मू-काश्मीरमधील चिनाब ब्रिजविषयी माहिती मिळवू पाहत आहे. ब्रिजविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानी आणि चिनी गुप्तचर यंत्रणांकडून जमविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Advertisement

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा चीनच्या यंत्रणेच्या इशाऱ्यावर विशेषकरून जम्मू-काश्मीरच्या चिनाब ब्रिजविषयी अधिक तपशील मिळवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचमुळे आता गुप्तचरांकडून इशारा देण्यात आला आहे. यात चिनाब ब्रिजविषयी पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणंनी महत्त्वपूर्ण माहिती जमविली असल्याचे नमूद आहे.

चिनाब ब्रिज हा रियासी आणि रामबन जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेब्रिज आहे. याला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणूनही ओळखले जाते. अलिकडेच या पूलावर परीक्षण करण्यात आले आहे.

चिनाब नदीवर उभारण्यात आलेला हा ब्रिज सुमारे 359 मीटर इतका उंच आहे. हा ब्रिज पॅरिसच्या प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंच आहे. भारतीय रेल्वेने चमत्कार घडवत काश्मीर खोऱ्यात संगलदानपासून रियासीपर्यंत सुमारे 46 किलोमीरटच्या हिस्स्यात मेमू रेल्वेचे पहिल्यांदाच यशस्वी परीक्षण केले आहे.

सद्यकाळात काश्मीरला देशाच्या उर्वरित हिस्स्यांशी जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक हिवाळ्यात अनेकदा ठप्प होत असते. मोठ्या हिमवृष्टीमुळे महामार्गांवरील वाहतूक रोखावी लागते. अशास्थितीत चिनाब ब्रिजमुळे भारताला काश्मीरमध्ये रणनीतिक लाभ मिळणार आहे. काश्मीरमधील हिमालयीन क्षेत्रात दीर्घकाळापासून भारत आणि पाकिस्तानदरम्यान संघर्ष होत राहिला आहे.

भूकंप, विस्फोट झेलण्याची क्षमता

जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा ब्रिज उणे 10 अंश तापमानापासून 40 अंश तापमान सहन करू शकतो. जम्मू-काश्मीरच्या हवामानाचा या ब्रिजवर कूठलाच प्रतिकूल प्रभाव पडणार नाही. याचबरोबर हा ब्रिज भूकंप आणि स्फोट झेलण्याची क्षमता बाळगून आहे.

Advertisement
Tags :

.