कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कार जाहीर

03:32 PM Nov 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार वितरण

Advertisement

सातारा - वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड ( पुणे ), प्रा.वृषाली मगदूम ( वाशी- मुंबई ), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांची निवड करण्यात आली व जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संशोधक, विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार ( लातूर ) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व यशवंतराव दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली. या पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Advertisement

डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने सहा वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षीच्या सहाव्या पुरस्कारासाठी विचारशलाका त्रैमासिक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार ( लातूर) यांची निवड करण्यात आली आहे. यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल . भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी दीपक गायकवाड ( पुणे) यांच्या ' पेरियार -मिथक आणि वास्तव ' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.

भोळे कुटुंबीय व दाते संस्थेचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ .भा.ल .भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. वृषाली मगदूम ( वाशी - मुंबई ) यांची निवड करण्यात आली आहे. डॉ . यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इतिहास विभागातील प्राध्यापक , संशोधक डॉ. देवकुमार अहिरे ( पुणे) यांची निवड करण्यात आली आहे .

वरील पुरस्काराचे स्वरूप डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे.पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे ,प्रा. हाशम शेख (वर्धा ), डॉ . अशोक चौसाळकर ( कोल्हापूर ), डॉ.चैत्रा रेडकर, विजयाताई भोळे,हिरण्यमय भोळे ,माधुरी सुमंत( पुणे ) व किशोर बेडकिहाळ ( सातारा ) आदी मान्यवरांनी काम केले अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे संजय इंगळे तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली.माधुरी सुमंत , विजयाताई भोळे व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे .

Advertisement
Tags :
#LifetimeAchievement#ResearchExcellenceBholeMemorialAwardSataraAwardsSocialServiceRecognitionYashwantraoDateAward
Next Article