डॉ. वैद्य यांची बेळगावमध्ये सुपरस्पेशालिटी ओपीडी
सांध्यांच्या आजारासंबंधी गुरुवारी तपासणी : दक्षता हॉस्पिटल, तिसरे रेल्वेगेट येथे आयोजन
बेळगाव : पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे गुऊवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत दक्षता हॉस्पिटल, खानापूर रोड, तिसऱ्या रेल्वेगेटजवळ, टिळकवाडी-बेळगाव येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपरस्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी, खुब्याच्या तसेच मणक्यांच्या विकाराविषयी मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांची माहिती व तपासणी केली जात आहे.
रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट, एक्सरे आणि अन्य रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. गुडघेदुखी समस्या ही आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या वजनामुळे अधिकच गुडघेदुखी होते. गुडघ्याची तपासणी सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे, व्यायामांनी आराम मिळतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र दुर्बिणीद्वारे उपचार, पीआरपी इंजेक्शन याद्वारे करता येतात. अंतिम टप्प्यातील झीज, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता आमूलाग्र बदल होऊन रोबोटिकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणून रुग्णांना उपलब्ध करून देणारे विख्यात तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य स्वत: रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल प्रा. लि. चे ते कार्यकारी संचालक आहेत. जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. 45,000 हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया 12,000 रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि 1,50,000 हून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. त्यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या साहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणून त्यांनी 12,000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
वैद्य यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी संपादन केली. नंतर ऑर्थोपेडिक्समध्ये उच्चशिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळविले. त्यांचे 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. देश-विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी 8355838808 या क्रमांकावर संपर्क साधावा.