कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. शिवानंद कुडतलकर लोकायुक्तांच्या जाळ्यात

12:40 PM Jul 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी 

Advertisement

कारवार : रुग्णालयाला बेड्सचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून लाच घेताना येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाधीन जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आणि प्रसूती तज्ञ डॉ. शिवानंद कुडतलकर गुरुवारी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. या घटनेने जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. अंकोला येथील मौसीन अहमद शेख नावाचे ठेकेदार येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बेड्सचा पुरवठा करतात. रुग्णांच्या बेड्स टेंडरचे साडेतीन लाख रुपयांचे बिल देण्यासाठी डॉ. कुडतलकर यांनी शेख यांच्याकडून 75 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार शेख यांनी डॉ. कुडतलकर यांना 20 हजार रुपये दिले आणि 30 हजार रुपये गुरुवारी आणून देण्याची मागणी केली. दरम्यान कुडतलकर यांच्या लाचखोरी वृत्तीला वैतागलेल्या ठेकेदार शेख यांनी येथील लोकायुक्त डीवायएसपी धन्या नाईक यांच्याकडे कुडतलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. ठरल्याप्रमाणे शेख यांनी कुडतलकर यांना 30 हजार रुपये गुरुवारी दिले. त्याचवेळी डीवायएसपी धन्या नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. कुडतलकर यांना रंगेहाथ पकडले. लोकायुक्त डीवायएसपींनी डॉ. कुडतलकर यांच्यावर रितसर प्रकरण दाखल करून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Advertisement

विवादात्मक पार्श्वभूमी लाभलेला डॉ. कुडतलकर

डॉ. कुडतलकर कारवारचे सुपुत्र असून गेली अनेक वर्षे ते येथील जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत आहेत. तथापि ते वादाच्या भोवऱ्यात यापूर्वीही अडकले होते. येथील एका गरीब महिलेचा तीन बाळंतपणाच्या दरम्यान डॉ. कुडतलकर यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मृत्यू झाला होता, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. कुडतलकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तथापि, तत्कालीन आरोग्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने डॉ. कुडतलकर यांनी कारवाईपासून केवळ बचावच करून घेतला नव्हता तर येथील जिल्हा रुग्णालयात आपले ठाण पक्के करून ठेवले होते. आता डॉ. कुडतलकर लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article