महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिम्सचे विद्यार्थी डॉ. शरणाप्पा यांनी पी.जी. नीट परीक्षेत रोवला झेंडा

11:18 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संपूर्ण देशात पटकाविला नववा क्रमांक : अभिनंदनाचा वर्षाव

Advertisement

बेळगाव : बेळगाव सरकारी वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय (बिम्स) चे विद्यार्थी डॉ. शरणाप्पा सिनप्पन्नवर यांनी पी.जी. नीट परीक्षेत देशात नववा क्रमांक पटकावला आहे. या वैद्यकीय विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या नावलौकिकात भर पडली आहे. बिम्स देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गणले जाते. पी.जी. नीट साठी झालेल्या परीक्षेत डॉ. शरणाप्पा सिनप्पन्नवर यांनी मोठे यश मिळविले आहे. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी डॉ. शरणाप्पा यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे बिम्सचा नावलौकिक आणखी वाढला आहे, अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

डॉ. शरणाप्पा हे मूळचे गदग जिल्ह्याचे. आई शशिकला व वडील तुळसाप्पा यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिम्समध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. अभ्यास करण्याला त्यांनी तपश्चर्या मानून रोज दहा तास नियोजनबद्धपणे अभ्यास केला. त्यामुळेच हे यश आपल्या पदरी पडल्याचे डॉ. शरणाप्पा यांनी सांगितले. देशात नववा क्रमांक पटकाविल्यामुळे आपली जबाबदारीही वाढल्याचे डॉ. शरणाप्पा यांनी सांगितले. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बिम्समध्ये प्राधान्य दिले जाते. या वैद्यकीय महाविद्यालयातील उत्तम शैक्षणिक वातावरणामुळे असे विद्यार्थी घडविणे शक्य झाले आहे, असे बिम्सच्या प्रमुखांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article