दुग्ध, पशुसंवर्धन व्यवसायातील तंत्रशुद्ध शिक्षण घ्या! डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांचे आवाहन
गोकुळच्या गोकुळ शिरगांव येथील प्रकल्प स्थळी भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळने अत्याधुनिक पद्धतीने दूध उत्पादन प्रक्रिया राबवून दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता जपली आहे. गोकुळ म्हणजे गुणवत्ता असे जे समीकरण तयार झाले आहे, त्याचे खरे श्रेय दूध उत्पादकांना आहे. गोकुळने नेहमीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधलेली आहे. भविष्यात तरुणांनी दुग्ध व पशुसंवर्धन व्यवसायातील तंत्रशुद्ध शिक्षण घ्यावे व दुग्ध व्यवसाय वाढवावा असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले.
गोकुळच्या गोकुळ शिरगांव येथील मुख्य प्रकल्पस्थळी डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते डॉ. संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय पाटील व त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली व विस्तारित प्रकल्पाची प्रशंसा केली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले.
यावेळी डॉ.डी.वाय.पाटील अॅग्रीकल्चर व टेक्नीकल युनिव्हर्सिटी तळसंदेचे उपकुलपती प्रा.डॉ.के.प्रतापन, प्रताप महाले(पुणे), गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, बाबासाहेब चौगले, अजित नरके, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, चेतन नरके, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, सुधाकर पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.