महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बैलूर संभाजी हायस्कूलमध्ये डॉ. राजगोळकर यांचे मार्गदर्शन

06:07 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ जांबोटी

Advertisement

बैलूर संभाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी व बी. व्हा.r व्हा.r एस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बागलकोटचे विद्यार्थी डॉ. ऋषिकेश राजगोळकर यांनी संभाजी हायस्कूलमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन करून उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

Advertisement

संभाजी हायस्कूल बैलूरचे मुख्याध्यापक समरसेन पाटील यांनी डॉ. ऋषिकेश राजगोळकर यांचा परिचय करून स्वागत केले. यावेळी डॉ. राजगोळकर यांनी आरोग्यविषयक ज्ञान याविषयी मार्गदर्शन करून हृदय, किडनी याची काळजी कशी घ्यावी तसेच समतोल आहार व आहारातील भाज्या व फळांचे महत्त्व तसेच मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व व व्यसनाधीनतेमुळे मानवी शरीरावर होणारे दृश्य परिणाम आदी विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षक एन. बी. पाटील, शिक्षिका ए. व्ही. साळुंखे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article