कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. प्रकाश आमटे यांना जीवनगौरव पुरस्कार

11:00 AM Jul 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

येथील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा 2025 सालचा जीवनगौरव पुरस्कार ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते, रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे यांनी दिली.

Advertisement

डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठी ‘लोक बिरादरी’ प्रकल्प उभारला असून त्या माध्यमातून आदिवासींसाठी दवाखाना, शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरू केले आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले आहे. सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना आदिवासीसेवक पुरस्कार (महाराष्ट ^शासन), गॉड फिलीप जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती सोहळ्यामध्ये त्यांना शेतमजूर, दुष्काळ निर्मूलन चळवळ, सांस्कृतिक चळवळ व श्रमिक मुक्ती आंदोलनाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राम दाभाडे, प्रमोद तोडकर, सचिव हरिभाऊ बल्लाळ, कार्याध्यक्ष राहुल वायदंडे, उपाध्यक्ष कृष्णत तुपे, सुरज घोलप, रमेश सातपुते, अॅड. विशाल देशपांडे, रमेश सातपुते, गजानन सकट व संजय तडाखे उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article