डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त देवदर्शन
बेळगाव : 77 व्या वाढदिवसानिमित्त केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी नांदेड जिल्ह्यातील औंदा श्री नागनाथ ज्योतिर्लिंग व बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी रुद्राभिषेकासह इतर धार्मिक विधीही पार पाडले. पत्नी आशा कोरे, मुलगी डॉ. प्रीती कोरे-दोडवाड यांच्यासह डॉ. प्रभाकर कोरे यांनी देवदर्शन घेतले. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लिंगराज कॉलेजच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणासंबंधी जागृती करण्यात आली. स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानचे गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्र येथे फळे व मिठाई वाटण्यात आली.
यावेळी प्राचार्य एच. एस. मेलीनमनी यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान अनमोल आहे. त्यांच्या हातून आणखी सेवाकार्य घडो, ते शतायुषी व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी पदवीपूर्व विभागाचे प्रा. गिरीजा हिरेमठ, डॉ. जी. एन. सिली, डॉ. एच. एस. चन्नाप्पगोळ, डॉ. सी. रामराव, डॉ. नंदिनी, डॉ. मल्लण्णा, डॉ. राघवेंद्र हजगोळकर आदी उपस्थित होते. बी. व्ही. बेल्लद कायदा महाविद्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या डॉ. ज्योती हिरेमठ, एनएसएसचे अधिकारी प्रा. आलप्पन्नावर आदी उपस्थित होते. दरम्यान, श्री नागनाथ ज्योतिर्लिंग व परळी वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करण्यात आला.