महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. माधवराज एस. यांना पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार

12:21 PM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मनोहर पर्रीकर स्मृती पहिला युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून तो डॉ. माधवराज एस. यांना प्राप्त झाला आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रख्यात भारतीय आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने हा निकाल दिला आहे. रोख पाच लाख रुपये आणि गौरव चिन्ह असे त्या पुरस्काराचे स्वऊप आहे. डॉ. माधवराज एस. हे यु. आर. राव सॅटेलाईट सेंटर इस्त्रो येथे कार्यरत आहेत. हा पुरस्कार 13 डिसेंबर रोजी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात त्यांच्या जन्मदिनी एन.आय.ओ. दोनापावला येथे देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 106 जणांचे अर्ज आले होते. त्यातील 14 जणांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यातून डॉ. माधवराज एस. यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निकालाचा अहवाल डॉ. काकोडकर समितीने सरकारला अर्थात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article