टॅफेच्या उपाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मी वेणू
मुंबई :
ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांची विक्री करणाऱ्या टॅफे या कंपनीच्या उपाध्यक्षपदी (व्हाइस चेअरमन) डॉ. लक्ष्मी वेणू यांची निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सदरची निवड केली गेली आहे. डॉ. लक्ष्मी वेणू या नेतृत्व करणाऱ्या संघामध्ये महत्त्वाच्या सदस्या असून त्यांची योग्य ती निवड करण्यात आल्याचे चेअरमन मल्लिका श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. कंपनीच्या कारभारात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. नेतृत्व कुशलतेच्या त्यांच्या गुणांची पारख करूनच उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. टॅफेच्या मॅसी फर्ग्युसन आणि आयशर ट्रॅक्टरच्या व्यवसायामध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे. संघटनेला अधिक बळकटी देण्यामध्ये येणाऱ्या काळात लक्ष्मी वेणू यांचे योगदान महत्त्वाचे असेल.
नूतन उपाध्यक्षा काय म्हणाल्या
यावेळी बोलतार्नी त्या म्हणाल्या, संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी येणाऱ्या काळात कर्तव्याने सार्थ ठरवेन. कंपनीच्या समग्र विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार असल्याचे लक्ष्मी वेणू यांनी सांगितले.