For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलईच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ.कोरे यांचे मार्गदर्शन

11:19 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलईच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ कोरे यांचे मार्गदर्शन
Advertisement

व्हीटीयू आयोजित परीक्षेतील उत्तुंग कामगिरीची केली प्रशंसा

Advertisement

बेळगाव : केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी व्हीटीयूच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले, त्यांचा केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी सत्कार केला. यावेळी ते म्हणाले, तुमचे कठोर परिश्रम, गुणवत्तेबाबतची निष्ठा, अविरत मेहनत यामुळेच हे यश तुम्हाला मिळाले आहे. या यशामुळे तुमचे कुटुंबीय आणि संस्थेला आनंद झाला आहे. तुमच्याबद्दल अभिमान वाटतो आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही तुमच्या कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक वस्तूपाठ घालून दिला आहे.

यावेळी साहिल सोमनाचे (सिव्हिल इंजिनिअरिंग, 9.49) याने व्हीटीयूमध्ये केवळ प्रथम क्रमांकच मिळवला नाही तर बारा सुवर्णपदकेही मिळविली आहेत. कीर्ती सोळंकी (बायोमेडिकल इंजिनिअरिंग, 9.13) हिने विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्नेहल जबाडे (बायोमेडिकल इंजिनिअरिंग, 9.03) हिने विद्यापीठाला द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जीवन (केमिकल इंजिनिअरिंग, 9.01) याने विद्यापीठाला तृतीय क्रमांक मिळविला आहे. याशिवाय निकिता गावडे, जान्हवी जिरनकळी यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये अनुक्रमे पाचवा व सहावा क्रमांक मिळविला आहे.

Advertisement

अंकिता गर्डे (बायोमेडिकल इंजिनिअरिंग), साहिल मुल्ला (केमिकल इंजिनिअरिंग) यांनी विद्यापीठाला सातवा तर आदित्य कुलकर्णी (ई अँड सी इंजिनिअरिंग) याने विद्यापीठाला दहावा क्रमांक मिळविला आहे. सत्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेबद्दल व प्राध्यापकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समारोप करताना डॉ. कोरे यांनी आजचे हे यश म्हणजे केवळ सुरुवात आहे. तुमच्या अधिक उत्तुंग कामगिरीची जग वाट पाहत आहे, असे सांगितले. याप्रसंगी केएलईचे सचिव डॉ. बी. बी. देसाई, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील व प्राध्यापक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.