डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून मंत्री नितीन गडकरी यांना पुस्तक भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
रस्ते परिवहन व राज्यमार्ग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडाळ्याला एका लग्नासाठी आले हाते. यावेळी ‘तऊण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी डॉ. किरण ठाकुर यांनी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरवर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत भेट म्हणून नितीन गडकरी यांना दिली. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लोकमान्य सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापासून तऊणांनी प्रेरणा घ्यावी व आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने लोकमान्य सोसायटीने दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. या पुस्तकाच्या किमान एक लाख प्रती घरोघरी पोहोचविण्याचा लोकमान्यचा उद्देश असल्याचे डॉ. किरण ठाकुर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रकाशक मुकुल मार्णे व अमेय जोशी उपस्थित होते.