डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते रामजी गडगाणे यांचा सत्कार
01:02 PM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : योगगुरू रामजी गडगाणे यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त उष:काल मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गडगाणे हे लोकांना मोफत योगसेवा देऊन त्यांचे जीवनमान उंचावत आहेत. सर्वांनीच योगसाधना करावी, असे मत डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बाळासाहेब काकतकर, मिलिंद देशपांडे, सुहास किल्लेकर, विनायक कंग्राळकर, रमेश हन्नीगेरी, श्रीकांत देसाई, किरण गावडे, विवेक गिरी व मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
Advertisement
Advertisement