कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉ. किरण ठाकुर यांना ‘गुरु माहात्म्य पुरस्कार’ जाहीर

11:44 AM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुणे  : ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’तर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा ‘गुरु माहात्म्य पुरस्कार’ यंदा ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी यांनी गुऊवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाकुर यांच्यासोबत विज्ञाननिष्ठ अध्यात्माचे प्रणेते अभिजीत पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  रविवार 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व  25,000 ऊपये असे पुरस्काराचे स्वऊप आहे. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. किरण ठाकुर यांनी समाजातील समावेशक विकासाच्या तत्त्वज्ञानाला पुढे नेले आहे. प्रख्यात पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून ‘तरुण भारत’च्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article