माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनबाई उद्या भाजपा प्रवेश? शिवराज पाटील- चाकुरकरांच्या सूनबाई डॉ. अर्चनाताई पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा
सोलापूर प्रतिनिधी
अर्चना पाटील चाकूरकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र काही ना काही कारणास्तव प्रवेशास उशीर झाला आहे. आता पुन्हा एकदा अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
आज दि. 29 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते राज्यसभेवर गेले. आता अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे आणखी एक मोठे नाव आणि काँग्रेसचा नेता भाजपकडून गळाला लागण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यानंतर आता अर्चना पाटील चाकूरकरही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.