For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ.अंजली निंबाळकर यांनी घेतली शिरसी येथील मान्यवरांची भेट

12:37 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ अंजली निंबाळकर यांनी घेतली शिरसी येथील मान्यवरांची भेट
Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शिरसी येथील काही मान्यवरांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. ज्येष्ठ सहकारी नेते दि. श्रीपाद हेगडे यांच्या घरी भेट देऊन हेगडे यांच्या कुटुंबीयांनी चहापाण्याचा आनंद लुटला. दि. हेगडे यांच्या स्नुषा प्रमोद हेगडे यांनी निंबाळकर यांची ओटी भरली. याप्रसंगी हेगडे म्हणाल्या ज्यावेळी माजी केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा कारवार लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी अल्वा यांचीही हेगडे कुटुंबीयांतर्फे ओटी भरण्यात आली होती. त्या निवडणुकीत अल्वा यांनी बाजी मारली होती. अल्वाप्रमाणे तुम्हीही यावेळी बाजी माराल, असा विश्वास हेगडे यांनी व्यक्त केला. यावेळी राज्य किसान काँग्रेसचे कार्यदर्शी श्रीपाद हेगडे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राचप्पा जोगळेकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. जोगळेकर यांच्याशीही निंबाळकर यांनी निवडणूक संदर्भात चर्चा केली. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौड, ज्योती पाटील आदी उपस्थित होते. शिरसीहून खानापूरला प्रयाण करण्यापूर्वी निंबाळकर यांनी श्री सोंदा स्वर्णवल्ली मठाचे अध्यक्ष व्ही. एस. हेगडे बोमनहळ्ळी यांची भेट घेतली. शिरसी नगरसभेचे माजी अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याच घरी निंबाळकर यांनी भोजनाचा अस्वाद घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.