चिमुकल्याचा मृत्यू; डॉ.अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोडची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
डॉ.अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड; नेमकं काय घडलं?
सांगली
मिरजेतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश अमनापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचे बाळ उपचारापूर्वी दगावले. या घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांकडून डॉ. अमनापुरे यांच्या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याच्या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडे वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली. ही तोडफोडची घटना हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
उपचारा पूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 2010 मेडिकलनुसार कारवाई करण्याची मागणी मिरजेचे आयएमएचे अध्यक्ष डॉ रविकांत पाटील यांनी केली. मिरजेतील इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या डॉक्टरांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधितावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मिरजेतील गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.