डॉ. अभिजित सेठ ‘एनएमसी’चे नवे अध्यक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डॉ. अभिजित सेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (‘एनएमसी’) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी अध्यक्ष डॉ. गंगाधर यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये राजीनामा दिला. योग्य उमेदवार न मिळाल्याने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. आता डॉ. अभिजित शेठ यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉ. शेठ यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला आहे. डॉ. सेठ यांनी यापूर्वी राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे (एनबीई) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ते सुप्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन देखील आहेत.
डॉ. शेठ यांची ‘एनएमसी’ अध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती ही भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि प्रॅक्टिससाठी नियामक संस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल आहे. एक तज्ञ सर्जन म्हणून त्यांनी केलेली सेवा आणि ‘एनबीई’मधील त्यांचा अनुभव आता नवीन भूमिकेतही मौल्यवान अंतर्दृष्टी आणेल अशी अपेक्षा आहे.