महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तैवान ओपनमध्ये भालाफेक प्रकारात डीपी मनूला सुवर्ण

06:40 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ तैपई सिटी

Advertisement

भारताचा स्टार भालाफेकपटू डीपी मनूने शनिवारी तैवान ओपनमध्ये 81.58 मीटर थ्रो करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या रौप्य विजेत्या मनूने आपल्या पाचव्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो नोंदवला. विशेष म्हणजे, मनूची सर्वोत्तम कामगिरी 84.35 मी इतकी आहे. पॅरिस ऑलिम्पिक कोटा 85.50 मीटरला असून आतापर्यंत नीरज चोप्रा व किशोर जेना यांनी पात्रता मिळवली आहे. स्पर्धेसाठी एका महिन्याचा कालावधी असून मनूला ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी असणार आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 24 वर्षीय मनूने पहिल्या प्रयत्नात 78.32 मी भाला फेकला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 76.80 मी, तिसऱ्या प्रयत्नात 80.59 मी भालाफेक केली. चौथ्या प्रयत्नात त्याने फाऊल केला पण अखेरच्या प्रयत्नात 81.58 मीटर थ्रो करत सुवर्णमय कामगिरी मनूने नोंदवली. दरम्यान, तैवानच्या चेंग चाओने 76.21 मीटरसह रौप्यपदक तर हुआंग चाओने कांस्यपदक पटकावले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article