माणसांमधून प्राण्यांमध्ये फैलावले दुप्पट विषाणू
नव्या अध्ययनात चकित करणारा खुलासा
कुठल्याही प्रकारची महामारी किंवा नवा आजार फैलावल्यास त्याची उत्पत्ती एखाद्या प्राण्याशी जोडणे सोपे असते. वटवाघळांमुळे कोविड-19 फैलावला, चिम्पाझींमध्ये एड्सचा विषाणू फैलावल्याचे बोलले जाते. परंतु आता एक नवे अध्ययन समोर आले असून यात माणसांनी प्राण्यांना अधिक विषाणूंनी संक्रमित केले असल्याचे म्हटले गेले आहे.
विषाणू फैलावण्याचा मार्ग एकतर्फी राहिलेला नाही. सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध व्हायरल जीनोमचे अध्ययन केल्यावर हैराण करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. माणूस प्राण्यांना दुप्पटीहून अधिक विषाणू देत असतो. तर प्राणी असे करत नाहीत. वैज्ञानिकांनी 1.20 कोटी वायरल जीनोमचे अध्ययन करत त्याचा डाटा अभ्यासला आहे.
3000 प्रकरणं अशी आहेत, ज्यात विषाणू एका प्रजातीच्या जीवातून दुसऱ्या प्रजातीच्या जीवामध्ये जातो. यात 79 टक्के विषाणू हे एक प्राण्याच्या प्रजातीमधून दुसऱ्या प्राण्याच्या प्रजातीत पोहोचतात. 21 टक्के विषाणू हे माणसांमुळे फैलावत असल्याचे आढळून आले आहे.
अनेक प्राणी होतात संक्रमित
या तीन हजार विषाणूंपैकी 64 टक्के विषाणू हे माणसांमधून प्राण्यांमध्ये फैलावतात. याला एंथ्रोपोनोसिस म्हटले जाते. केवळ 36 टक्के विषाणू हे प्राण्यांमधून माणसांमध्ये पोहोचत असतात. विषाणूच्या या ट्रान्समिशनच्या प्रक्रियेला जूनोसिस म्हटले जाते. एंथ्रोपोनोसिचा शिकार होणाऱ्या जीवांमध्ये पाळीव मांजरं, श्वान, अश्व, डुक्कर, गुरांचा समावेश आहे. याचबरोबर केंबडी, बदक, चिम्पाझी, गोरिल्ला, हॉउलर मंकीप, रकून, उंदिर यांनाही याचे संक्रमण होत असते. वन्यप्राण्यांना देखील माणसांमधून फैलावणाऱ्या विषाणूंच्या संक्रमणाचा धोका असतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या जेनेटिक इन्स्टीट्यूटमध्ये डॉक्टोरल स्टुडंट सेड्रिक टॅन यांनी माणूस पर्यावरणावर अनेक प्रकारचे प्रभाव पाडत असल्याचे म्हटले आहे. प्राणी असो किंवा वृक्ष सर्वांवर मानवी हालचालींमुळे प्रभाव पडत आहे. यासंबंधीचे माझे अध्ययन नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशन या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. माणूस आणि प्राणी लाखो-कोट्यावधी मायक्रोब्स घेऊन फिरत असतात. जे ए प्रजाती दुसऱ्या प्रजातीच्या नजीक जातात आदान-प्रदान होते. सर्वसाधारणपणे सस्तनप्राणी, पक्षी, उभयचर आणि माशांमध्ये हे घडत असते असे सेड्रिक यांनी म्हटले आहे.
माणसांना धोका एच5एन1 चा
जेव्हा कुठलाही विषाणू एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत जातो तेव्हा तो स्वत:च्या लक्ष्याच्या हिशेबानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणत असतो. शतकांपासून महामारींनी कोट्यावधी माणसांचा जीव घेतला आहे. याचे कारण विषाणू पॅथोजेन आणि बॅक्टेरिया राहिले आहेत. जूनोसिस म्हणजेच प्राण्यांमधून माणसांमध्ये येणाऱ्या आजारांवरून पूर्ण चिंतेत आहे. माणसांमध्ये असलेल्या विषाणूंचे कारण कुठे ना कुठे प्राणीच आहेत. सध्या सर्वात मोठा धोका बर्ड फ्लू एच5एन1 वरून असून हा आजार वेगाने जंगलातील पक्ष्यांमध्ये फैलावत असल्याचे सेड्रिक यांनी सांगितले आहे.