For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काय आहे विंटर ब्ल्यूज?

06:36 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
काय आहे विंटर ब्ल्यूज
Advertisement

हिवाळा येताच मन होऊ लागते उदास

Advertisement

चांगल्याप्रकारे सुरू असलेल्या जीवनात जर ऋतूने उदासीचा रंग मिसळला तर वाईट तर वाटणारच. हिवाळ्याचे लोक खुल्या मनाने स्वागत करतात. परंतु काही लोकांमध्ये हा बदलणारा ऋतू उदासी, चिंता, तणाव, झोपेची कमतरता, नैराश्य यासारखी लक्षणे निर्माण करतो. याला मनोचिकित्सेच्या क्षेत्रात विंटर ब्ल्यूज म्हणून ओळखले जाते. बदलत्या ऋतूसोबत मूड बिघडणे एखाद्या डिसऑर्डरचे कारण असू शकते.

हे प्रत्यक्षात सीझनल एफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजेच एसएडीमुळे होऊ शकते. सोप्या भाषेत याला विंटर ब्ल्यूज म्हटले जाते. हवामान बदलल्यावर खासकरून थंडी सुरू झाल्यावर लोकांमध्ये एक मानसिक विकार घेऊ लागतो.

Advertisement

सीझनल एफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजेच एसएडी एक असा मनोविकार आहे, जो ऋतूजन्य परिस्थितींवर निर्भर करतो. अनेकदा सीझनल पॅटर्न चेंज झाल्यावर काही लोकांना दु:ख घेरू लागते. शरीरात कमजोरी आणि उदासी निर्माण होते. खासकरून थंडीत जेव्हा तापमान कमी होऊ लागते, तेव्हा ही लक्षणे दिसून येतात. मग हिवाळ्यात हा प्रकार सुरू राहतो. याला विंटर ब्ल्यूज म्हटले जाते. यानंतर उन्हाळा येताच संबंधित व्यक्ती सामान्य होतो. विंटर ब्ल्यूजला पूर्णपणे दुर्लक्षित केले जाऊ नये. अनेकदा ही लक्षणे दीर्घकाळापर्यंत व्यक्तीमध्ये राहू शकतात.

एसएडी अनेकदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही नैराश्याची लक्षणे देतो. यात उदास मनोदशा आणि ऊर्जेत कमी जाणवते. यात जोखिमीत सर्वाधिक महिला असतात. विशेषकरून कमी वयाच्या आणि स्वत:च्या घरापासून दूर राहणाऱ्या महिलांना याची जोखीम असते. अनेक प्रकरणांमध्ये फॅमिली हिस्ट्री डिप्रेशन किंवा बायपोलर डिसऑर्डर इत्यादी असल्यासह विंटर ब्ल्यूज होण्याची शक्यता बळावते.

ऋतू बदलताना हे होत असल्यास व्हा सावध

-झोपेचा कालावधी कमी किंवा अत्यंत अधिक झाल्यास.

-सामाजिक हालचाली कमी झाल्यास किंवा संभाषण कमी झाल्यास.

-उदासपणा किंवा हताशाने वेढल्यास, मूड खालावल्यास.

-वजन अचानक घटू किंवा वाढू लागल्यास.

-भूक लागणे अचानक कमी होऊ लागल्यास.

-ऊर्जापातळी कमी आणि कमजोरी वाटू लागल्यास.

असा होतो उपचार...

सीझनल पॅटर्न एसेसमेंट क्वेश्चनेयरद्वारे या डिसऑर्डरचे निदान केले जाते. यात प्रश्नांच्या उत्तराद्वारे मनोवैज्ञानिक हा डिसऑर्डर कुठल्या पातळीवर आहे हे जाणून घेतात. यात माइल्ड म्हणजेच कमी, मॉडरेट म्हणजेच सरासरी, मार्क्ड म्हणजेच चिन्हित लक्षणांची पातळी असल्यास त्याचप्रकारे उपचार केला जातो. या डिसऑर्डरच्या टिपिकल ट्रीटमेंटमध्ये अँटी डिप्रेशेंट औषधांसोबत लाइट थेरपी, व्हिटॅमिन डी आणि समुपदेशनाद्वारे उपचार केले जातात.

Advertisement
Tags :

.