For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांगुर फाट्यावर दुहेरी वाहतूक सुरु

12:28 PM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मांगुर फाट्यावर दुहेरी वाहतूक सुरु
Advertisement

निपाणी परिसरातील संततधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे पाणी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाट्यापर्यंत आल्याने महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात आली होती. मात्र शनिवारपासून पावसाने उघडीप दिल्याने नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी सोमवारी सकाळी 11 पासून मांगुर फाट्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Advertisement

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रविवारी रात्री काहीसा पाऊस झाला असला तरी सोमवारी सकाळपासून पुन्हा वातावरण स्वच्छ दिसून येत आहे. पाऊस थांबल्याने नदीकाठच्या गावांनाही मोठा दिलासा मिळाला. मांगुर फाटा येथे शुक्रवारी रात्रीपासून एकेरी वाहतूक सुरू होती. तीन दिवसानंतर पाणी पातळी घटून सोमवारपासून दोन्ही मार्गाने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी सीपीआय बी. एस. तळवार, अवताडे कंपनीचे व्यवस्थापक विजय दाईंगडे यांच्यासह पोलीस तसेच औताडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.