बीएससी टेक्स्टाईल मॉलमध्ये डबल डिस्काऊंट सेल
चार आठवडे चालू राहणार : 20 टक्के सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगावमध्ये तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बीएससी टेक्स्टाईल मॉलला बेळगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. यंदासुद्धा दि. 5 जुलैपासून चार आठवडे डबल डिस्काऊंट योजना लागू करण्यात येत आहे. बीएससी मॉलमध्ये खरेदी केलेल्या वस्त्रप्रावरणांवर 10 टक्के सवलत देण्यात येतेच. मात्र, आता ठरावीक कालावधीसाठी 20 टक्के सवलत देण्यात येत असून बेळगावकरांनी व परराज्यांतील ग्राहकांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॉलचे संचालक बी. यू. चंद्रशेखर यांनी केले.
गुरुवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दरवर्षी आम्ही डबल डिस्काऊंट योजना राबवतो. मात्र, हा क्लिअरन्स सेल नव्हे तर नवीन उत्पादनांवर ही सवलत आम्ही देत आहोत. गेली तीन वर्षे आम्ही राबविलेल्या या योजनेला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत. जे ग्राहक वर्षभर आमच्याकडे खरेदी करून आम्हाला पाठिंबा देतात, त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता म्हणून आम्ही डबल डिस्काऊंट योजना राबवत आहोत.
याशिवाय सोमवार ते शुक्रवारी दुपारी 12 वाजता ‘स्पेशल काऊंटर’ सुरू आहे. जेथे ठरावीक वस्त्रप्रावरणे माफक दरात ते उत्पादन संपेपर्यंत विकली जात आहेत. यालासुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय बीएससीमध्ये नव्यानेच चांदीच्या दागिन्यांची विक्री सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी इमिटेशन ज्युवेलरी विक्रीचे दालन होतेच, त्यामध्ये आता सिल्व्हर ज्युवेलरीच्या दालनाची भर पडली आहे, असेही ते म्हणाले. श्रावणापासून सुरू होणाऱ्या सणांच्यादरम्यान योजना राबविणे संयुक्तिक नाही का?
या प्रश्नावर ऑफ सिझनमध्ये आमचे उत्पादक आम्हाला कमीत कमी मार्जिन ठेवून उत्पादने पुरवतात आणि तोच फायदा ग्राहकांना मिळावा, यासाठी आम्ही ही योजना जुलैमध्ये राबवत असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. आगामी योजनांबद्दल ते म्हणाले, दावणगिरी येथे भव्य अशी मोठी शोरुम सुरू होत आहे. शिमोगा येथील शोरुमचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. बेळगावमध्ये बीएससीच्या वरच्या मजल्यावर कँटीन सुरू करणार होतो. परंतु, अग्निशमन दलाकडून हिरवा कंदील मिळाला नाही. त्यामुळे बीएससीच्या जवळपास जागा बघून कँटीन सुरू करण्याचा विचार आहे. या पत्रकार परिषदेवेळी चंद्रशेखर यांचे सुपुत्र वेद उपस्थित होते. प्रारंभी अमजद जमादार यांनी स्वागत केले. वीरण्णा यांनी आभार मानले.