महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठी विद्यानिकेतनला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट

10:23 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्राथमिक विभाग मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात महांतेशनगर शाळेचा एकतर्फी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविळा.अंतिम सामन्यात तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले. तसेच माध्यमिक विभाग मुलींच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला. व अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या खेळाडूंना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्रशिक्षण श्रीधर बेन्नाळकर व क्रीडा शिक्षण महेश हागीदळे, दत्ता पाटीळ व पूजा संताजी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article