डोरस्टॉपर दगड ठरला मूल्यवान
रोमानियात एका वृद्ध महिलेन 3.5 किलोग्रॅमचा लाल रंगाचा दगड स्वत:च्या दरवाजाचा स्टॉपर म्हणून बाळगला होता. हा दगड त्यांना एका नदीच्या काठावर मिळाला होता. त्यांनी तो घरात आणला होता. अनेक वर्षांपासून हा दगड त्यांच्या घराच्या दरवाजावर स्टॉपर होता. प्रत्यक्षात या दगडाची किंमत 8.49 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कारण हा जगतील सर्वात मोठा अंबर असून ज्याला रुमानाइट देखील म्हटले जाते. अंबर प्रत्यक्षात वृक्षातून निघणाऱ्या रेसिनद्वारे तयार होतो, जो निर्माण होण्यास लाखो-कोट्यावधी वर्षे लागतात, मग हळूहळू तो कठोर होत जातो.
एका काळानंतर हा जीवाश्मात रुपांतरित होतो. ज्याला सर्वसाधारणपणे लोक जेमस्टोन समजू लागतात. रोमानियात बहुतांश अंबर कोल्टी गावाच्या बुजाऊ नदीच्या आसपास मिळतात. अशा दगडांच्या शोधात तेथे 1920 मध्ये खाण सुरू करण्यात आली होती. ही वृद्ध महिला देखील कोल्टी गावातच राहते. एकदा तिच्या घरात चोरी झाली होती, परंतु चोरांनी हा दगड नेला नव्हता.
1991 मध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता, त्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना हा दगड आवश्यक नसल्याचे वाटले, परंतु काही प्रमाणात चौकशी केल्यावर या दगडाचे मूल्य त्यांना कळले. तेव्हा त्यांनी हा दगड रोमानियन स्टेटला विकला.
7 कोटी वर्षे जुना दगड
हा दगड 3.8 ते 7 कोटी वर्षे जुना असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. प्रोविंशियल म्युझियम ऑफ बुजाऊचे संचालक डॅनियल कोस्टाचे यांनी हा शोध वैज्ञानिक आणि पुरातात्विक दोन्ही आधारावर अद्भूत असल्याचे म्हटले आहे. आता हा दगड रोमानियाची राष्ट्रीय संपत्ती आहे. 2022 मध्ये हा दगड प्रोविंशियल म्युझियम ऑफ बुजाऊमध्ये ठेवण्यात आला आहे.