महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुळशी धरणाचे दरवाजे उघडले! ८०० क्यूसेकने विसर्ग

02:29 PM Jul 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

धरण ९० टक्के भरले, परिचलन सूचीप्रमाणे पाणी सोडले

धामोड / वार्ताहर

तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण मुसळधार स्वरूपाचे असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुराचा विचार करता शासनाच्या परिचलन सूचीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून प्रति सेकंद ८०० क्युसेक्शने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे .त्यामुळे तुळशी नदी पात्राच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

Advertisement

३.४७ टीएमसी व ६१६.९१ मिटर पाणी पातळी असणाऱ्या धामोड ( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच केळोशी बुद्रुक येथील लोंढ - नाला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ३०० क्युसेक्स प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग तुळशी जलाशयात येत आहे .

Advertisement

मुसळधार पाऊस , लोंढानाला प्रकल्पातून येणारे पाणी व अंतर्गत उगाळ यामुळे सध्या जलाशय ९० टक्के इतके भरले आहे. गेल्या चोवीस तासात २०१ मिलिमीटर तर जूनपासून आजअखेर २६९६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे तुळशीजलाशयाची पाणी पातळी ६१५. o२ मीटर इतकी झाली आहे .शासनाच्या परिचलनसूची प्रमाणे आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून ८oo क्युसेक्श प्रतिसेकंद इतका विसर्ग तुळशी नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे तुळशी नदीपात्राच्या पाणीपतळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या नदीवर असणारे आरे , बीड , बाचणी , घुंगुरवाडी , कांचनवाडी हे बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. तुळशी नदीपात्राच्या पाण्यात वाढ होत असल्याने नदी तीरावरील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा तुळशी प्रकल्पाच्या शाखाअभियंता अंजली कारेकर यांनी दिला आहे

Advertisement
Tags :
kolhapur newsTulsi Dam
Next Article