महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘कोविड’बाबत चिंता नको; प्रतिबंधक उपायांचे पालन हवे !

11:53 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात कोविड ऊग्णांची संख्या वाढत असली तरी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधक उपायांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण यापूर्वी कोविड-19 काळात लोकांनी स्वत:हून कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून या संकटाला परतवून लावले होते. आता पुन्हा ऊग्ण सापडत असले तरी चिंता करण्याची गरज नाही. आरोग्य खात्याला योग्य खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. पणजी येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर कोविड ऊग्ण वाढत असलेल्या संख्येबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते पुढे म्हणाले की आपण दुर्लक्ष केल्यामुळे कोविड वाढू शकतो. त्यामुळे लोकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सतत करणे गरजेचे आहे. गोमेकॉत कोविड चाचणी केली जाते. लोकांना सतत ताप येत असल्यास किंवा काही सौम्य स्वऊपाचे लक्षणे दिसल्यास त्यांनी स्वत:हून चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री राणे यांनी केले.

Advertisement

चोवीस तासांत 13 ऊग्णांना बाधा, चार बरे

Advertisement

राज्यात गेल्या 24 तासांत चाचणी केलेल्या 273 नमुन्यांमधून 13 नवीन कोविड प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे राज्यातील एकूण कोविडची संख्या 61 वर पोहोचली आहे. नव्या 13 पैकी दोन व्यक्तींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर 11 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत 4 व्यक्ती बरे झाल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article