महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिव्यांगांचे चुकीचे चित्रण करू नका

06:15 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने निर्मात्यांना दिले दिशानिर्देश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चित्रपटांमध्ये दिव्यांगांना दर्शविणारे दृश्य चित्रित करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी कठोर भूमिका घेत दिव्यांगांना चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यास आक्षेप घेतला आहे. चित्रपटांमध्ये दिव्यांगांसमोरील केवळ आव्हाने दाखविली जाऊ नयेत, तर त्यांचे यश, प्रतिभा आणि समाजातील योगदानही प्रकर्षाने दाखविले जावे असे न्यायालयाने स्वत:च्या निर्देशात म्हटले आहे. न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवर हे निर्देश जारी केले आहेत.

दिव्यांगांवर अपमानास्पद टिप्पणी करणे किंवा व्यंगात्मक पद्धतीने चित्रिकरण केले जाऊ नये. दिव्यांगाचा तिरस्कार केला जाऊ नये, उलट त्यांची योग्यता दाखविली जावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने हा निर्णय निपुण मल्होत्रा यांच्याकडून दाखल याचिकेवर दिला आहे. हिंदी चित्रपट ‘आंख मिचोली’मध्ये दिव्यांग व्यक्तींसंबंधी अपमानास्पद दृश्यं दाखविण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.  सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शब्द संस्थात्मक भेदभावाला बळ पुरवितात आणि दिव्यांग व्यक्तींविषयी सामाजिक धारणेत ‘अपंग’ यासारखे शब्द भेदभाव करणारे असल्याचे म्हटले आहे.

चित्रपट प्रमाणन संस्था सीबीएफसीने स्क्रीनिंगची अनुमती देण्यापूर्वी तज्ञांचे मत घेतले जावे. तसेच व्हिज्युअल मीडियाने दिव्यांग  लोकांचे वास्तव आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करावा. केवळ त्यांच्यासमोरील आव्हाने नव्हे तर त्यांचे यश, प्रतिभा आणि समाजातील त्यांचे योगदानही दाखवावे. केवळ मिथकाच्या आधारावर त्यांची थट्टा केली जाऊ नये असे खंडपीठाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article