महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अब ‘हार’ना मना है!

06:45 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या पूर्ण स्पर्धेत खऱ्या अर्थाने क्रिकेटने आपले चढउतार दाखवले. जे अपेक्षित होतं ते घडलंच नाही. एकंदरीत काय क्रिकेट आपल्या खेळाला जागला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांच्या डोळ्यात वेगवेगळे अश्रू बघायला मिळाले. आफ्रिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.32 वर्षाची तपश्चर्या फळास आली होती. त्यांच्या अश्रुंची ख्रया अर्थाने फुले झाली होती. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या डोळ्यातील अश्रू त्यांना नकोसे वाटत होते. कमीत कमी दोन वर्षांसाठी तरी त्यांना अश्रूंचा बांध हा घालावा लागेल. असो. मागील पाच ते सहा दिवसात या स्पर्धेत काही देशाने बदला घेतला. काहीनी भळभळत्या  जखमेवरती मलम लावलं. काहींनी तर ओल्या जखमेवरची खपली काढली.तर काहींनी चोकर्सचा डाग पुसला. थोडक्यात काय तर मागील तीन ते चार सामने एकमेकांच्या परतफेडी मध्येच गेले. काही गोष्टींचे उत्तर हे ‘काळच’ देत असतो. काल तीही औपचारिकता पूर्ण झाली.

Advertisement

मागील टी 20 विश्वचषक विजेता इंग्लंडने आपल्याला उपांत्य फेरीतच चितपट केलं होतं. तेही अगदी कमी कालावधीत. काल उरला सुरला तोही  भारताने बदला घेतला. इंग्लंड संघ दुस्रयाच्या कुबड्या घेत सुपरएट पर्यंत कसाबसा पोहोचला होता हे ही काल सिद्ध झालं. इंग्लंड आणि भारत यांचं उपांत्य फेरीचे फार जुने नातं आहे. 1983 चा वर्ल्डकप जिंकण्या अगोदर उपांत्य फेरीत  भारताने त्यांच्याच भूमीत त्यांचाचं पराभव करण्याचा पराक्रम केला होता. त्याचीच परतफेड लगेच पुढच्याच  वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडने केली.मुंबईत भारताला पराभवाचे तोंड पाहायला लावलं.( दिलीप वेंगसरकरची पोट दुखी अंगाशी आली होती ) ही परतफेड झाली एकदिवशीय क्रिकेटमधील. ऊ20 च्या छोट्या फॉरमॅटमध्ये 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत  इंग्लिश संघा कडून सपाटून मार खाल्यानंतर त्याचीच परतफेड चालू विश्वचषकात अगदी त्यांच्याचं स्टाईल मध्ये केली.कधीकधी नाणेफेक जिंकल्यानंतर दुस्रयाला ठआप ठम्हणणं खूपच धोकादायक ठरतं. इंग्लिश संघा बद्दल काल तेच घडलं. काल पुन्हा एकदा रोहित शर्मा राजेशाही थाटात वावरला. त्याचा वावर हा पूर्णत: त्याच्या लवाजमासहित असतो हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. रोहित या पूर्ण स्पर्धेत सुऊवातीला फॉर्मात नव्हता. परंतु एकदा तो का फॉर्मत आला की संघासाठी वटवृक्ष बनतो. एखाद्या गोलंदाजासाठी यॉकर हा त्याचा निश्चितच  ब्रह्मास्त्र असू शकेल, परंतु रोहित साठी ठपुलचाठ फटका  त्याच्यासाठी ब्रह्मास्त्र पेक्षा कमी नसतो.पुन्हा एकदा हार्दिक पंड्या श्रीकृष्णासारखा ऐन मोक्याच्या क्षणी धावून आला. आज पर्यंत क्रिकेटचा इतिहासात मी कधी न पाहिलेले समानांतर षटकार काल बघितले. एखाद्या थाळीफेक स्पर्धकाने थाळी फेकावी तसा त्याने चेंडू सीमा पार भिरकवला.

Advertisement

दुस्रया बाजूने ज्यावेळी ही स्पर्धा सुरू झाली होती त्यावेळी भारतीय चमु मध्ये चार चार मंदगती गोलंदाज  कशाला हवेत? या प्रश्नाचा भडीमार पत्रकारांनी रोहित शर्मावर केला होता. त्यावर रोहित हसून म्हणाला होता की याचं उत्तर तुम्हाला वेस्टइंडीज मध्ये मिळेल. काल त्याचे उत्तर आपल्या सर्वांना मिळाले तेही अगदी महत्त्वपूर्ण सामन्यात. किती दिवस आम्ही बूमराहच्या जीवावर जगणार? काल त्याचेही उत्तर मंदगती त्रिकूटाने देऊन टाकले. कुलदीप यादव भारतीय संघासाठी ख्रया अर्थाने ठकुलदीपकठ बनू पाहतोय. नाण्यावरतीठ गोलंदाजी करणे म्हणजे नेमकं काय? याचं मूर्ती म्हणजे उदाहरण म्हणजे कुलदीप यादव. पूर्वीच्या काळी याचे उत्तम उदाहरण म्हणजे पद्माकर शिवलकर होते.( दुर्दैवाने त्यांच्यासाठी कसोटीचा दरवाजा काही उघडला नाही ) कुलदीपसाठी  त्याचा ‘रॉंगवन’ हा चेंडू ट्रेडमार्क ठरू पाहतोय. या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट इंद्रधनुष्यासारखे आपले रंग दाखवत आहे. काल त्यांनी गत विजेत्या इंग्लंडलाही सोडलं नाही. क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर नांगर टाकणे हा वाक्प्रचार त्यांना काही सार्थ ठरवता आला नाही. काल इंग्लंडच्या फलंदाजांचा ख्रया अर्थाने ब्रेक फेल झाला होता. परंतु ब्रेक फेल झालेली गाडी गियर मध्ये कंट्रोल करता येते हे ते विसरूनच गेले. किंबहुना गाडीला हॅन्ड ब्रेक असतो हे ही ते विसरले.असो.

ही विश्वचषक स्पर्धा आता परमोच्च क्षणापर्यंत येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संघ विश्वचषक क्रिकेट मधील  पराभवऊपी कर्जातून मुक्त झाला आहे. प्रत्येक संघाला प्रत्येक प्रश्नाचे रोखठोक उत्तर दिले आहे. किंबहुना ते मिळाले आहे.आता फक्त विजयाचे एक पाऊल बाकी आहे. तेही या स्पर्धेत भारताप्रमाणे अपराजित राहिलेल्या दक्षिण आफ्रिके विऊद्ध. हॉरर चित्रपट बघताना मल्टिप्लेक्स मध्ये ‘डरना मना है’ असं आपण आपल्या मनाला समजवत असतो. अगदी तसंच  स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठहारना मना हैठ असे करोडो भारतीय म्हणत नसतील तरच नवल. जी चूक नोव्हेंबर 2023 मध्ये भारताने अहमदाबाद मध्ये केली होती, ती चूक बार्बाडोस मध्ये नको रे बाबा एवढेच म्हणावसं वाटतं. आत्ताच कुठे ती जखम भरून आली आहे. त्या जखमा पुन्हा नकोच. सरते शेवटी भारतीय संघाला ‘विजयी भव’ असा  आशीर्वाद करोडो भारतीय देत असतील एवढं मात्र निश्चित!

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article