महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खरेदीची पावती चुरगळून टाकू नका

12:59 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
Don't crush the purchase receipt.
Advertisement

कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी : 

Advertisement

आपली खरेदीत फसवणूक झाली म्हणून अनेकजण आमच्याकडे येतात. पोट तिडकीने आपली झालेली फसवणूक सांगतात. त्यांना पैसे गेल्याचे दु:ख असते. बनावट वस्तू पदरात पडल्याचा संताप असतो. मग आम्ही नुकसान भरपाईसाठी दाद कशी मागायची याचा सल्ला देतो. आणि खरेदी केलेल्या वस्तूंची पावती तुमच्याकडे मागतो. पण तुम्हीच नव्हे तर 70 ते 80 टक्के लोकांनी त्यांनी केलेल्या खरेदीनंतर पावतीचा चुरगळा करून दुकानाबाहेरच टाकलेला असतो किंवा पावती कोठे ठेवली याचा त्यांना पत्ताच नसतो. त्यामुळे जे काही खरेदी कराल त्याची पावती घ्या. जपून ठेवा. जेथे खरेदीची पावती दिली जात नाही तेथे काहीही खरेदी करू नका असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर प्रांत संघटक प्रभाकर बुरांडे यांनी आज ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितले. आज होण्राया राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ते बोलत होते.

Advertisement

ते म्हणाले, आपण ग्राहक म्हणून जर मनापासून जागरूक राहिलो तर कोणीही आपली फसवणूक करू शकणार नाही. पण बहुसंख्य नागरिक खरेदीबद्दल जागरूक नाहीत. अगदी पाण्याची बाटली घेताना त्या बाटलीवरची मूळ किंमतही आपण बघत नाही. दहा रुपयाची बाटली 15 रुपयाला आरामात घेतो. विक्रेत्याला त्याची वस्तू ग्राहकाशी बोलून माहिती देऊन विकण्याचा अधिकार आहे. पण चांगल्या दर्जाच्या वस्तू विकण्याची व विक्री झाल्यानंतर पावती देण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण ग्राहक कोणतीही खातर जमा न करता आम्ही दाखवणाऱ्या जाहिरातींना भूलतात गोड बोलण्याला फसतात व वस्तू खरेदी करतात. काहीजण पावती घ्यायला ही थांबत नाहीत. काहीजण पावती घेतात पण दुकानाची पायरी उतरत उतरत त्या पावतीचा चुरगळा करून फेकून देतात. किंवा पावती जपून न ठेवता पुन्हा सहज मिळणार नाही अशा ठिकाणीच पावती ठेवतात.

ते म्हणाले, ग्राहक संरक्षण कायद्यात खूप चांगल्या तरतुदी आहेत. उदाहरणार्थ आपण सहलीला महाबळेश्वरला जातो तेथे काही वस्तू खरेदी करतो. परत आल्यानंतर लक्षात येते की काही वस्तू बनावट आहेत. खराब आहेत. पण आपण महाबळेश्वरला जाऊन कधी आणि कोणाकडे तक्रार करायची असा विचार मनात आणतो. आणि झालेले नुकसान अक्कल खाते जमा करतो. स्वत:वरच संतापतो आणि काही वेळाने शांत होतो. नेमका याचाच फायदा काही विक्रेते घेतात व फसवणूक करत राहतात.

ते म्हणाले, विक्रेता त्याची वस्तू खपवण्यासाठी जरूर रंगवून वर्णन करणार. कारण ती त्याची कला आहे. पण आपले ही कर्तव्य आहे की, तो जी माहिती देईल त्याची जेवढी करता येईल तेवढी खातरजमा करून घेतली पाहिजे. सर्वच विक्रेते फसवणूक करतात असे अजिबात नाही. पण काही ठिकाणी फसवणूक होते. विक्रीची पावती देणे टाळले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी खबरदारीच आवश्यक आहे. अमुक एक तेल लावल्यानंतर आठ दिवसात टकलावर केस येतील अशा जाहिरातींची तर प्रत्येकाने शहनिशा करण्याची गरज आहे. किंवा एखादे शीतपेय प्यायल्यानंतर विमानातून उडी मारण्याचे धाडस येते असल्या फसव्या जाहिराती पासून लांब राहिली पाहिजे. किंवा अगदी दर्जेदार कंपन्यांच्या वस्तू अधिकृत किमतीपेक्षा कमी दरात पावती शिवाय कोठे विकल्या जात असतील तर सावध राहणेच आवश्यक आहे. आता तर दाम दुप्पट नव्हे, दाम तिप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या जाहिरातींचा सुकाळ आहे. साधी गोष्ट आहे. असा दाम तिप्पट लाभ कोणीही देऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही थोडी जागरूकता दाखवली तर आपली मोठी फसवणूक नक्कीच टाळू शकणार आहे.

                                 गावातील ग्राहक न्यायालयातूनही दाद मागता येते

प्रभाकर बुरांडे म्हणाले, तुम्ही महाबळेश्वरला खरेदी केली आणि वस्तू खराब निघाली तर महाबळेश्वरमध्ये जाऊन ग्राहक न्यायालयात दाद मागावी लागत नाही. ग्राहक कायद्यातील तरतुदीनुसार तुम्ही जेथे राहतात त्या तुमच्या गावातील ग्राहक न्यायालयात महाबळेश्वरच्या त्या विक्रेत्याविरुद्ध तुम्ही दाद मागू शकता. पण ही दाद मागण्यासाठी तुमच्याकडे खरेदीची पावती आवश्यकच असते. आणि ती तुम्ही जपून ठेवावीच लागते. आम्ही पाहतो की, फसवणूक झालेल्या अनेक ग्राहकांच्याकडे खरेदीची पावतीच नसते त्यांनी ती चुरगळा करून टाकलेली असते. किंवा पावती कोठे ठेवली हेच त्यांच्या लक्षात नसते. पण इथेच तुमचे नुकसान होते. आणि फसवणूक करणाऱ्याचे आपोआप फावते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article