For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोंगरगाव रस्त्याबाबत न्यायालयात दाद मागणार

10:26 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
डोंगरगाव रस्त्याबाबत न्यायालयात दाद मागणार
Advertisement

डोंगरगाव ग्रामस्थांचा निर्णय : येत्या पंधरा दिवसांत नव्याने रस्ता डांबरीकरण न केल्यास इशारा

Advertisement

खानापूर : डोंगरगाव संपर्क रस्त्याचे डांबरीकरण मागीलवर्षी मे महिन्यात करण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन महिन्यातच हा रस्ता उद्ध्वस्त झाल्याने डोंगरगाव ग्रामस्थांनी या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत खानापूर जिल्हा पंचायत अभियंत्यांना निवेदन देवून रस्ता पुन्हा नव्याने करण्याची मागणी केली होती. मात्र कंत्राटदाराने पुन्हा निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केल्याने डोंगरगाव ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असून येत्या पंधरा दिवसात जर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण न केल्यास याबाबत कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.  तालुक्यातील खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर असलेले डेंगरगाव गावासाठी संपर्क रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार फंडातून 30 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याचे काम मागीलवर्षी मे महिन्यात केले होते. मात्र काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने महिन्याभरातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी ख•s पडून रस्त्यावरची खडी पूर्णपणे वर आली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. याची दखल घेत कंत्राटदाराने पुन्हा पॅचवर्क करून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ग्रामस्थांनी याबाबत बैठक घेऊन संपर्क रस्त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरण न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील संपर्क रस्त्यांची कायमच दैनावस्था होत असून अवघ्या दोन-तीन महिन्यातच रस्ते उद्ध्वस्त होण्याची मालिकाच सुरू आहे. या रस्त्याचा 30 लाखाचा निधी ख•dयात गेला म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता, आम्ही काय करू, असा सवाल करत ग्रामस्थांना परतावून लावण्यात आले आहे.

30 लाख रुपये खर्चून  1100 मी. रस्त्यावर पसरली खडी

Advertisement

याबाबत ‘तरुण भारत’शी बोलताना डोंगरगाव येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू पाटील म्हणाले, डोंगरगाव गावाच्या संपर्क रस्त्यासाठी 25 वर्षानंतर 30 लाखाचा निधी मंजूर झाला होता. मात्र कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा रस्ता अवघ्या एका महिन्यातच उद्ध्वस्त झाला होता. मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने रस्ता थोडाफार शिल्लक आहे. जर दरवषीप्रमाणे पाऊस असता तर हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता. तीस लाख ऊपये खर्चून फक्त अकराशे मीटर रस्त्यावर खडी पसरुन बिले काढली आहेत. त्यामुळे डेंगरगावचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. याबाबत आवाज उठवल्यानंतर कंत्राटदाराने काही ख•dयांचे पॅचवर्क केले आहे. मात्र हे पॅचवर्कही निकृष्ट दर्जाचे असून येत्या पावसात हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी रस्ता नव्याने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. कंत्राटदाराने येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू केले नसल्यास आम्ही न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Advertisement
Tags :

.