महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

32 मण सुवर्णसिंहासनासाठी लाखाची देणगी

10:20 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हलगा गावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

तालुक्यात नवरात्रोत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून विविध गावांमध्ये झालेल्या दुर्गामाता दौडमध्ये धारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सुरू केलेल्या या दौडला ग्रामीण भागातून यंदा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. दौडच्या माध्यमातून तरुणांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडले आहे. तसेच गावागावांमध्ये जनजागृती झाली. हलगा येथील शिवनेरी चौक, मरगाई गल्लीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने 32 मण सुवर्णसिंहासनासाठी एक लाखाचा निधी देण्यात आला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे तालुक्यात सध्या कौतुक होत आहे.

32 मण सुवर्ण सिंहासनासाठी संभाजी भिडे गुरुजी यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यासाठी हलगा गावातील धारकऱ्यांनी स्वेच्छेने ही मदत करून छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेली आपली निष्ठा दाखवून दिली आहे. दुर्गराज रायगड येथे होणारा 32 मण सुवर्ण सिंहासन हा सर्वांसाठी एक आनंदाचा उपक्रम असून छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व तरुणांसाठी एक आदर्श आहेत. त्यामुळे आपण आपल्या गावातील धारकऱ्यांकडूनही मदत निधी सुपूर्द करण्यात आला आहे, अशी हलगा गावातील काही तरुणांनी माहिती दिली. नवरात्र उत्सवात झालेल्या दुर्गा माता दौडच्या माध्यमातून गावात 32 मण सुवर्णसिंहासनासंदर्भात जनजागृती करण्यात आली. त्यामुळेच हा इतका निधी जमा झाला आहे. शिवनेरी चौक, मरगाई गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हलगा विभागप्रमुख प्रसाद धामणेकर व गावप्रमुख रोहित येळ्ळूरकर यांच्याकडे सदर निधी सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बालाजी काँक्रिटचे मालक सचिन सामजी, नलू सामजी, ज्ञानेश्वर कामानाचे, बाळू सामजी, पांडू बिळगोजी, भाऊराव देवलकर, माऊती दंडकार, स्वप्निल वासोजी, ऋत्विक वासोजी, अमोल कामानाचे, राजू चौगुले, सुरेश वाळके आदींसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी सचिन सामजी यांचे अधिक योगदान लाभले असल्याची माहिती तऊणांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सध्याच्या तऊण पिढीने आचरणात आणणे गरजेचे आहे. या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून प्रत्येक गावागावांत तऊणांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आणि स्मृती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाची दुर्गामाता दौड सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अशी ठरली आहे, असे प्रसाद धामणेकर यांनी सांगितले. एक लाखाचा निधी दिल्यानंतर यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला व आपले धर्म कर्तव्य पार पाडले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article