महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘डोनाल्ड ट्रम्प बचावणे हा चमत्कार’

06:32 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक नेत्यांच्या भावना : हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध : सीव्रेट सर्व्हिस प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत झालेला हल्ला खूपच गंभीर होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अमेरिकेसह जगातील सर्व मोठ्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी अमेरिकन सीव्रेट सर्व्हिसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सीव्रेट सर्व्हिसच्या संचालकांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी हल्ल्याशी संबंधित ‘एक्स’वर टाकलेल्या पोस्टवर लाखो कमेंट्स आल्या आहेत. ट्रम्प खूप भाग्यवान असल्यानेच त्यांचा जीव बचावल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

या हल्ल्यानंतर लोक आपला राग युनायटेड स्टेट्स सीव्रेट सर्व्हिसवर काढत आहेत. सीव्रेट सर्व्हिस चीफ किम्बर्ली ए. चिटली यांची पोस्ट व्हायरल होत असून त्यात त्यांनी ट्रम्पची सुरक्षा वाढवण्यास नकार दिल्याचा समाचार घेतला जात आहे.  किम्बर्ली यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा. त्यांनी ट्रम्प यांच्या जीवाशी खेळ केला आहे. हे पुन्हा कधीही होऊ नये. ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षित केले पाहिजे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या या घटनेने अमेरिकेच्या राजकारणात भूकंप झाला आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे खूप चिंतित : नरेंद्र मोदी

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी आपले मित्र माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. ‘माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना पीडित, जखमी आणि अमेरिकन लोकांच्या कुटुंबीयांसोबत आहेत’, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

हिंसाचाराला थारा नाही : बिडेन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीही या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केल्यानंतर हल्ल्याबाबत चिंताही व्यक्त केली. देशातील सर्व यंत्रणांकडून मी हल्ल्याची माहिती मिळविली असून मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. मी गुप्त सेवा आणि राज्य संस्थांसह सर्व एजन्सींचे आभार मानू इच्छितो, असेही बिडेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनीही संपूर्ण संरक्षण विभाग या हिंसाचाराचा निषेध करतो, असे ट्विट केले. अमेरिकेतील आमचे मतभेद सोडविण्याचा हा मार्ग नाही आणि असे कधीही होऊ नये, असेही ते पुढे म्हणाले.

‘एफबीआय’कडून तपास

एफबीआय हल्ल्यामागील हेतूचा तपास करत आहे, पण ही घटना व्रुक्सने एकट्याने घडवून आणली का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांचे लेफ्टनंट कर्नल जॉर्ज बेविन्स यांनी एजन्सींना सांगितले की, व्रुक्सने एकट्याने हे काम केले की इतर कोणी त्यात सामील आहे, हे ठरविणे अवघड आहे. सध्या हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला असला तरी आमचा तपास चालू आहे, असे बेविन्स म्हणाले. आम्ही अनेक संकेतांचे अनुसरण करीत आहोत. एकच बंदूकधारी होता की आणखी कोणी, हे निश्चित होण्यास थोडा वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले.

हल्लेखोर थॉमस व्रुक्स ‘स्टार अवॉर्ड’ विजेता...

► डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नात सहभागी असलेली व्यक्ती म्हणून एफबीआयने थॉमस मॅथ्यू व्रुक्सचे नाव जाहीर केले आहे. तो रिपब्लिकन मतदार म्हणून नोंदणीकृत होता. मात्र, नोंदणी कधी झाली हे स्पष्ट झालेले नाही.

► क्रूक्स हा बेथेल पार्क, पेनसिल्व्हेनियाचा रहिवासी होता. शालेय रेकॉर्डनुसार त्याने 2022 मध्ये बेथेल पार्क हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. वेस्टर्न पेनसिल्व्हेनियामधील द ट्रिब्यून-रिव्ह्यूनुसार नॅशनल मॅथ्स अँड सायन्स इनिशिएटिव्हकडून त्याला ‘स्टार अवॉर्ड’ही प्राप्त झाला होता.

► पोलिसांना व्रूक्सकडे एआर-15 सें.मी. ऑटोमॅटिक रायफल सापडली. अनेक साक्षीदारांनी गोळीबाराच्या आधी त्याला पाहिल्याचे सांगितले. लोकांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सावध केल्यानंतर काही क्षणात त्याचा खात्मा करण्यात आला.

► क्रूक्सने आश्रय घेतलेल्या इमारतीचे छत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीच्या स्टेजपासून 130 यार्ड दूर होते. त्यांनी अनेक राऊंड फायर केले, ज्यामध्ये एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. त्यानंतर सीव्रेट सर्व्हिसकडून हल्लेखोर मारला गेला.

52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला

अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी. वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ते राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवारही होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले. यापूर्वी 1972 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ. केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमधील निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article