डोनाल्ड ट्रम्प बालंबाल बचावले
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर भरसभेत गोळीबार : 20 वर्षीय हल्लेखोराचा खात्मा,
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करत असताना त्यांना लक्ष्य करत अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ट्रम्प बालंबाल बचावले. सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर देत हल्लेखोराचा काही क्षणातच खात्मा केला. 20 वषीय थॉमस मॅथ्यू व्रुक्स असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या या गोळीबारामुळे जगभरात खळबळ निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत गोळीबाराचा निषेध केला आहे.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारसभा घेत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. व्यासपीठावर भाषण सुरू असतानाच झालेल्या हल्ल्यात त्यांच्या उजव्या कानाला गोळी लागली. याचदरम्यान घटनास्थळी उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यांना तत्काळ मंचावरून उतरवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीव्रेट सर्व्हिस एजंटने त्यांना घेरत घटनास्थळावरून बाहेर काढत रुग्णालयात नेले. मात्र ते सध्या सुरक्षित आहेत. त्यांना ऊग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोराने डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करत सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. एआर-15 रायफलमधून 8 राउंड फायर करण्यात आले. पहिल्या फेरीत 3 तर दुसऱ्या फेरीत 5 गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यूएस सीव्रेट सर्व्हिसने एक निवेदन जारी करून हल्ल्यासंबंधीची माहिती दिली. हल्लेखोराने सभास्थळानजिकच्या उंच इमारतीवरून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले. 130 यार्ड दूर असलेल्या इमारतीच्या छतावरून थॉमस व्रुक्सने अनेक गोळ्या झाडल्या. त्यापैकी ट्रम्प यांच्या कानाला एक गोळी लागली. एका मॅन्युपॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून थॉमस व्रुक्सने गोळीबार केल्याचेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी
या हल्ल्यात ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सीव्रेट सर्व्हिसने म्हटले आहे. गोळीबारात सभेला उपस्थित असलेल्या अन्य एका प्रेक्षकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या म्हणण्यानुसार त्याने संशयित हल्लेखोराला गोळ्या घातल्या.
कोणी चालवल्या गोळ्या?
ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराची ओळख 20 वषीय थॉमस मॅथ्यू क्रूक्स अशी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. हल्ला करण्यासाठी थॉमस क्रूक्स हा बटलर फार्म शोग्राऊंडच्या स्टेजपासून 130 यार्ड अंतरावर एका मॅन्युपॅक्चरिंग प्लान्टच्या छतावर बसला होता. या हल्लेखोराचे फोटोही व्हायरल झाले आहेत. सीव्रेट सर्व्हिस काउंटर स्निपर्सनी त्याला ताबडतोब ठार केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला दुखापत
गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला मोठी जखम झाली आहे. सुऊवातीला गोळीबार झाल्यानंतर ट्रम्प जमिनीवर पडले, ते जखमी झाल्यासारखे वाटत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ माजी राष्ट्रपतींना घेरले आणि मंचावरून खाली आणले. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यात कानाजवळून रक्त ओघळत असूनही ट्रम्प हात उंचावून बोलताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी गर्दीच्या दिशेने हवेत हात फिरवला आणि ‘आम्ही लढू’ असे सांगितले. गोळीबार होताच सभास्थळी अनेक समर्थक ओरडतानाही दिसत आहेत. हल्ल्यानंतर ट्रम्प यांना तत्काळ व्यासपीठावरून हटवण्यात आले. सीव्रेट सर्व्हिसने त्यांना एका मोटारगाडीत ठेवून प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना पिट्सबर्ग परिसरातील ऊग्णालयात नेण्यात आले.
अचानक गोळीबार अन् गुप्तचर जवान दक्ष!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला. येथे ट्रम्प जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आले असता अचानक गोळीबाराचा आवाज येताच उपस्थित असलेले अमेरिकन सीव्रेट सर्व्हिस एजंट (गुप्तचर यंत्रणा) लगेचच कृतीत आले. गुप्तहेर जवानांनी घाईघाईने ट्रम्प यांना मंचावरून खाली आणत ताबडतोब ऊग्णालयात नेले. यावेळी ट्रम्प यांच्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसत होते