For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानपूर्व सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

06:41 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदानपूर्व सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
Advertisement

कमला हॅरिस यांना मोठा झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला आता केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना मोठा झटका बसला आहे. पहिल्यांदाच मतदानपूर्व सर्वेक्षणात रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना मागे टाकले आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. डिसिजन डेस्क हिलच्या नव्या सर्वेक्षणानुसार अध्यक्षीय निवडणुकीतील चढाओढप्रकरणी ट्रम्प यांनी आता  हॅरिस यांच्यापेक्षा 4 टक्के अधिक लोकांचे समर्थन प्राप्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता आता 52 टक्के असून कमला हॅरिस यांच्या विजयाची शक्यता आता केवळ 48 टक्के राहिली आहे.

Advertisement

ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर असले तरीही अनेक प्रांतांमध्ये अत्यंत चुरस दिसून येत आहे. यावेळी अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय अमेरिकेतील स्विंग स्टेट्स घेणार आहेत. ट्रम्प यांना विस्कोंसिन आणि मिशिगनमध्ये आघाडी मिळणार असल्याचे चित्र आहे. तर एरिजोना, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रम्प यांची आघाडी कायम आहे. नेवादा, एरिजोना, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्विनिया, मिशिगन आणि विस्कोंसिन या प्रांतांमधील जनतेचा कल या निवडणुकीकरता महत्त्वाचा ठरणार आहे.

कमला हॅरिस यांनी स्वत:च्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासून सर्वेक्षणात सातत्याने आघाडी मिळविली होती. परंतु आता लोकांचा दृष्टीकोन बदलत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेत राहत असलेला भारतीय समुदाय 5 नोव्हेंबर रोजी होणऱ्या निवडणुकीपूर्वी कमला हॅरिस यांना मतदान करण्याबद्दल गोंधळाच्या मनस्थितीत आहे. कारण सिनेटर किंवा कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल म्हणून हॅरिस यांनी भारतीय समुदायादरम्यान स्वत:चा प्रभाव निर्माण केला नव्हता असा दावा अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते स्वदेश चटर्जी यांनी केला आहे.

इंडियन अमेरिकन्स फॉर हॅरिस नावाचा एक समूह तयार करण्यात आला आहे. हा समूह कॅलिफोर्नियासह अन्य प्रांतांमध्येही प्रचार करत आहे. परंतु कमला हॅरिस यांच्या भूमिकेबाबत साशंक असल्याने भारतीय समुदाय त्यांनाच मतदान करेल याची शाश्वती नसल्याचे चटर्जी यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.