For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार

07:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार
Advertisement

कोरोना काळात केलेल्या सहकार्याची दखल

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

डॉमिनिक रिपब्लिक या देशाच्या सरकारने त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती या देशाच्या प्रशासनाकडून गुरुवारी एका वक्तव्याद्वारे देण्यात आली आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन या देशाला मोठे साहाय्य केले होते. त्यामुळे कोराना उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यात हा देश यशस्वी ठरला होता. या साहाय्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉमिनिका देशाच्या राष्ट्रपती सिल्वेनी बर्टन यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला एक मोलाची भेट दिली होती. तो काळ कोरोना उद्रेकाचा होता. त्या काळात भारताने या देशाला अॅस्ट्रेजनिका लसीच्या 70 हजार मात्रा भेट म्हणून दिल्या होत्या. त्यामुळे कोरोना नियंत्रण करणे या देशाला शक्य झाले होते.

Advertisement

आमचे खरे मित्र

भारत देश आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या देशाचे खरे मित्र आहेत, अशी भावना डोमिनिका देशाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्कमिंट यांनी व्यक्त केली आहे. या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया केरीकोम सम्मेलनात प्रदान करण्यात येणार आहे. या सम्मेलनाचा प्रारंभ गयानाची राजधानी जॉर्जटाऊन येथे 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा पुरस्कार ऑन लाईन स्वीकारण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांकडून गुरुवारी देण्यात आली आहे.

अनेक देशांचे सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवित केलेले आहे. मागच्या जुलै महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट अॅन्ड्य्रू द अॅपोस्टल’ ने सन्मानित केले होते. त्यापूर्वी त्यांना भूतान देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम बिगर भूतानी नेता ठरले होते. यासमवेत त्यांना संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान, बहारिन, सौदी अरेबिया, फ्रान्स, इजिप्त, फिजी, पाऊआ न्यूगिनी, पलाऊ, अमेरिका, मालदीय आणि पॅलेस्टाईन या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.