महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याच्या प्रशासनाचा देशात दबदबा!

06:56 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय कामकाजमंत्री किरण रिजीजू यांचे गौरवोद्गार

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

गोव्यातील जनतेने नेहमीच बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. काँग्रेसच्या सत्ता काळात गोव्याची स्थिती कोलमडलेली अशी होती. त्यामुळे गोव्यातील जनतेने काँग्रेसला दूर सारून भाजपवर विश्वास ठेवला. भाजपनेच गोव्याचा विकास केला आहे. गोव्याने भाजपला भरभरून साथ दिलेली आहे. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यात गोव्याचाही मोठा वाटा आहे. गोव्याचे राज्य प्रशासन हे उत्तमरित्या चालत असून, देशात ते अव्वलस्थानी गणले जात असल्याने इतर राज्यांच्या मानाने गोव्याच्या प्रशासनाचा देशात दबदबा आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजीजू यांनी काढले.

पणजी येथे घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2024’ आढावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री रिजीजू म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाची अर्थव्यवस्था ढेपाळलेली होती. 2004 मध्ये जगात भारताची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची धुरा सांभाळताना भारताची अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ होऊन आज जगात भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराने देश बरबटलेला होता. परंतु भाजपने भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था मजबूत बनली आहे.

भाजपने सत्ता हाती घेतल्यानंतर देशातील जाती-धर्माचे राजकारण समूळ नष्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज लहान सहान व्यक्तीही अभिमानाने वावरत आहे. युवकांनाही स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज प्रत्येकाच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळेच भाजपला केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी देशवासीयांनी दिली, असेही रिजीजू म्हणाले.

अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या कार्यक्रमात राज्यातील उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज्यातील समस्या जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी देशवासियांचे सहकार्य हवे

कोट्यावधी रुपयांची आर्थिक तरतूद करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लहान व्यावसायिक व लोकांचाही विचार केलेला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात  कोणावरही बोजा टाकण्यात आलेला नाही. भरीव आर्थिक तरतूद व 2047 मधील भारताची स्थिती भक्कम करण्याच्यादृष्टीने हा अर्थसंकल्प जनतेसमोर ठेवण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देशवासियांचे सहकार्य हवे, असे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू म्हणाले.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article