For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त; केंद्र सरकारकडून महिला दिनाची भेट

06:59 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त  केंद्र सरकारकडून महिला दिनाची भेट
Advertisement

 : कोट्यावधी कुटुंबांचा आर्थिक भार हलका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शुक्रवारी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी स्वस्त करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी गुरुवारी पीएम उज्ज्वला योजनेवर उपलब्ध सबसिडी एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने दोन मोठे निर्णय जाहीर करत गृहिणींसह सर्वसामान्य देशवासियांना सुखद धक्का दिला आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होणार आहे.

Advertisement

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर स्वस्त झाल्याने महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ‘उज्ज्वला’मध्ये दिलासा दिल्यानंतर आता सर्वांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय तेल आणि वायूच्या किमती कमी केल्यामुळे ही कपात शक्मय झाली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 23 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सध्या 910 ते 930 रुपयांच्या आसपास असलेला सिलिंडर दर आता 810 ते 830 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सरकारच्या या पावलामुळे देशभरातील कोट्यावधी कुटुंबांचा आर्थिक भार हलका होणार आहे. देशात एकूण 31 कोटी 40 लाख एलपीजी कनेक्शन आहेत. त्यापैकी 10 कोटीहून अधिक लाभार्थी उज्ज्वला योजनेचे आहेत. या सर्वांना आता सिलिंडरसाठी कमी पैसे मोजावे लागतील. एलपीजीच्या किमतीत 100 रुपयांच्या सवलतीचा हा निर्णय 8 मार्चच्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच शनिवारपासून लागू होणार आहे.

शहरनिहाय वेगवेगळे दर

स्थानिक करांच्या अंमलबजावणीनुसार सिलिंडरचे दर राज्यनिहाय बदलतात.  स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सहा महिन्यांतील ही दुसरी कपात आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्टच्या उत्तरार्धात सिलिंडरच्या दरात 200 ऊपयांची कपात करण्यात आली होती. ऑगस्टपर्यंत राजधानी दिल्लीत 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर 1,103 ऊपयांना मिळत होता. त्यानंतर 200 रुपयांच्या कपातीमुळे त्याची किंमत 903 रुपये झाली होती. आता 100 रुपयांच्या सवलतीनंतर आता घरगुती सिलिंडर 803 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत 929 रुपये होती ती आता 829 रुपये झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत हे सिलिंडर 902.50 रुपयांना मिळत असून ते आता 802.50 रुपये झाले आहे.

उज्ज्वला लाभार्थींनाही दिलासा

उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी सिलिंडरवर सबसिडी 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे. पुढील एका वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत समाविष्ट कुटुंबांना प्रतिसिलिंडर 300 रुपये अनुदानासह 12 एलपीजी सिलिंडर मिळतील. केंद्र सरकारने देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांना अनुदानित एलपीजी सिलिंडर पुरवण्यासाठी पीएम उज्ज्वला योजनेचा कालावधी एका वर्षाने वाढवला आहे. सबसिडीची मुदत मार्च 2024 मध्ये संपत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुऊवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित दरकपातीमुळे उज्ज्वला लाभार्थींना घरगुती सिलिंडर 520 रुपयांनी प्राप्त होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत कनेक्शन मिळालेल्यांना आणि दुर्गम भागातील ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रतिसिलिंडर ठराविक रक्कम दिली जाते. जवळपास 10 कोटी कुटुंबांना फायदा होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे सरकारला 12,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.

Advertisement
Tags :

.