महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यज्ञ करणे म्हणजे कर्तव्य करणे

06:05 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एका प्रकारात योगी करत असलेल्या कर्मांचे आत्मानंदरुपी अग्नीत हवन करून टाकतात. माणसाच्या शरीरातील आंतरकर्मे ही प्राणांच्या मार्फत केली जातात तर हात, पाय ही कर्मेंद्रिये शरीराच्या बाहेरची कर्मे करत असतात. निरपेक्षतेने कर्म करण्यात आपले भले आहे हे ज्याला समजले आहे आणि ती कर्मे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहेत हे पटून जो त्यानुसार वागत असतो, तो त्याचा देह प्रारब्धावर टाकून आत्मानंद उपभोगत असतो. म्हणजे एकप्रकारे आपल्या विहित कर्मांचे देव काय ते बघून घेईल ह्या विचारातून तो ती आत्मानंदात विरघळवून टाकतो. त्याच्या दृष्टीने आत्मानंदाच्या पुढे व्यावहारिक कर्माचे काहीच मोल नसते. देहापासून स्वत:ला अलग करून ईश्वर चिंतनात गुंतवणे, त्यातून मिळणाऱ्या आत्मानंदात मश्गुल होणे आणि देहाला प्रारब्धावर सोपवणे असे ज्यांना साध्य होईल त्यांचा देव ऋणी  असल्याने त्यांची कामे तो स्वत: करत असतो.

Advertisement

पुढील श्लोकात कोणकोणती साधने वापरून साधक त्यांचे यजन करतात ते बाप्पा सांगत आहेत. बाप्पांचे यजन करण्याचा साधकांचा मुख्य उद्देश त्यांच्यातील सात्विकता वाढवण्याचा असतो. माणसाच्या स्वभावात सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण उपस्थित असतात. पूर्वकर्मांच्या प्रभावानुसार तिन्हीपैकी एका गुणाचे प्राबल्य असते. जे संत प्रवृत्तीचे असतात त्यांच्यात मुळातच सत्व गुणाचे प्राबल्य असते पण असे साधक फार थोडे, फार थोडे म्हणजे किती तर लाखात एखादाच असा असतो. तो गतीने मुक्तीच्या दिशेने सरकतो परंतु इतरांच्या स्वभावात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. ज्याला आपला स्वभाव सात्विक व्हावा असे ईश्वरकृपेने वाटू लागते तो आपल्या स्वभावात फरक पडावा म्हणून सात्विक कर्मे जास्तीतजास्त करायचा प्रयत्न करतो. ती त्याच्या हातून जसजशी वाढत जातील तसतसा त्याचा सत्व गुण वाढू लागतो आणि रज, तम गुणांचे प्रमाण कमी होऊ लागते. असे करत करत त्याला तिन्ही गुणांची साम्यावस्था गाठणे शक्य होते. मग त्याला आपण सात्विक कर्मे करायची आहेत हे लक्षात ठेवावे लागत नाही कारण तो स्वभावत: सात्विक झालेला असतो. ह्याप्रमाणे वागत असताना तो तिन्ही गुणांच्या पलीकडे पोहोचतो. सात्विकता वाढवण्याची साधने बाप्पा सांगत आहेत. ते म्हणाले,

व्येण तपसा वापि स्वाध्यायेनापि केचन । तीव्रव्रतेन यतिनो ज्ञानेनापि यजन्ति माम्  ।।34 ।।

अर्थ- दुसरे कोणी यति द्रव्याने, कोणी तपाने, कोणी ध्यानाने, कोणी तीव्र व्रताने आणि कोणी ज्ञानाने माझे यजन करतात. विवरण- यज्ञ करणे म्हणजे कर्तव्य करणे. हे कर्तव्य काही साधक प्रामाणिकपणे द्रव्य मिळवून त्यातील स्वत:पुरते घेऊन उरलेले गरजूंना दान करतात. ह्याला सत्पात्री दान असे म्हणतात. सगळ्यानाच द्रव्यदान करणे जमेलच असे नाही ते लोककल्याणकरी कार्ये करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. द्रव्ययज्ञामध्ये तुमच्याजवळ जे काही आहे ते मग तो पैसा असेल, धनधान्य असेल, शारीरिक श्रम करायची तयारी असेल ते ते समाजाच्या कार्यासाठी वापरण्याला महत्त्व आहे. आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यासाठी भलेबुरे मार्ग चोखाळतो. त्यामुळे पापाच्या राशी तयार होऊन तो पतित होतो. ते टाळण्यासाठी सन्मार्गाने मिळालेले धन निरपेक्षतेने दान केले की, द्रव्ययज्ञ सिद्ध होतो.

तपाचे कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकार आहेत. साधक त्या तिन्ही प्रकारातले नियम कसोशीने पाळून तपयज्ञ सिद्ध करत असतो. त्याबाबत भगवदगीतेच्या सतराव्या अध्यायात कोणते तप करताना  काय काय करायचे असते ते भगवंतानी सांगितलं आहे. त्याविषयी पाहू पुढील भागात....

                क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article