For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सैनिकांवर श्वानांकडून उपचार

06:45 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
सैनिकांवर श्वानांकडून उपचार
Advertisement

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात सैनिकांवर उपचार करण्यासाठी श्वानांचे साहाय्य घेतले जात आहे. यासाठी श्वानांचे एक विशेष प्रशिक्षित दल निर्माण करण्यात आले आहे. या देशात गेल्या अनेक दशकांपासून गृहयुद्ध भडकले आहे. त्यात आतापर्यंत 4.5 लाख लोक ठार झाले आहेत. तसेच असंख्य लोक जखमी झाले आहेत. हे गृहयुद्ध नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथील सेनादलांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. बंडखोरांशी लढता लढता अनेक सैनिक जखमी होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या श्वानदलाचे साहाय्य घेतले जात आहे. श्वान माणसावर वैद्यकीय उपचार कसे करु शकतील, असा प्रश्न आपल्या मनात उमटणे साहजिक आहे. त्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे, की हे उपचार मानसिक स्वरुपाचे आहेत. सैनिक जेव्हा जखमी होतात, तेव्हा केवळ त्यांच्या शरिराला जखमा होतात, असे नाही.

Advertisement

सततच्या युद्धामुळे सैनिकांना मानसिक दौर्बल्यही आलेले असते. कित्येकदा शारिरीक जखमांपेक्षा हे मानसिक दौर्बल्य किंवा मनोविकार अधिक धोकादायक ठरतात. त्यांच्यावरही उपचार करण्याची आवश्यकता असते. या मनोविकारांना दूर करण्यासाठी श्वानांचा उपयोग केला जात आहे. श्वानांच्या सहवासात माणसाला बरे वाटते. त्याचे मन प्रसन्न होते. नैराश्य किंवा भ्रम यासारखे विकार मनावर उपचार केल्याने दूर होतात. या देशाच्या प्रशासनाने असे उपचार करण्यासाठी व्रेटोस, राफा आणि लूपा नामक तीन श्वानदले सज्ज करण्यात आली आहेत. फरी फोर्स नामक आणखी एक दलही निर्माण करण्यात आले आहे. या दलातील श्वान जखमी सैनिकांच्या वॉर्डस् मध्ये जाऊन त्यांच्या सहवासात राहतात. श्वान हा माणसाशी अत्यंत प्रामाणिक राहणारा आणि माणसाला नि:स्वार्थी सहकार्य देणारा प्राणी आहे. त्याच्याशी खेळल्याने किंवा त्याच्या सहवासात राहिल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो. तो अधिक सकारात्मक बनतो. अशा प्रकारे त्याचे मानसिक विकार दूर होऊन तो त्याच्या शारिरीक जखमांमधूनही लवकर बरा होऊ शकतो, असा अनुभव आल्याने ही उपचारपद्धती कार्यरत करण्यात आली आहे. ती प्रभावी ठरत असल्याचे या देशातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.