For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बस-दुचाकी अपघातात दोड्डहोसूरचा युवक ठार

01:09 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बस दुचाकी अपघातात दोड्डहोसूरचा युवक ठार
Advertisement

मोटारसायकलस्वार बसच्या चाकाखाली सापडल्याने डोक्याचा चेंदामेंदा : ग्रामस्थांतून हळहळ

Advertisement

खानापूर : खानापूर-पारिश्वाड रस्त्यावर दोड्डहोसूर येथे दुचाकी आणि बसची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दोड्डहोसूर येथील गोविंद उर्फ संदेश गोपाळ तिवोलकर (वय 26) हा बसच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. खानापूर बस आगाराची खानापूर-चापगाव बस केए 22 एफ 0656 ही यडोगामार्गे खानापूरकडे येत होती. यावेळी दोड्डहोसूर येथील रहिवासी गोविंद तिवोलकर हा आपल्या दुचाकी क्रमांक केए 22 ईओ 9332 वरून खानापूरहून दोड्डहोसूरला जात होता. अचानक बस समोर आल्याने धडक झाली. दुचाकीसह गोविंद हा बसच्या चाकाखाली सापडला.

पुढील आणि मागील चाके डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे गोविंद जागीच ठार झाला. सदर घटना गावाजवळच झाल्याने दोड्डहोसूर येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन गर्दीला पांगवून पंचनामा केला. मृतदेह बसच्या चाकाखालून काढून खानापूर येथील सरकारी दवाखान्याच्या शवागृहात हलविला आहे. दोड्डहोसूर येथील युवक गावाजवळच ठार झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. गोविंद तिवोलकर हा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गोविंद याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, विवाहीत बहीण, काका, काकू असा परिवार आहे. खानापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.