महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोडामार्ग शहर भाजप युवा मोर्चा शहरअध्यक्षपदी राजेश फुलारी

03:04 PM Sep 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर
दोडामार्ग शहरात भाजपने युवा मोर्चा अधिक बळकट करण्यासाठी शहरअध्यक्षपदी राजेश प्रकाश फुलारी यांची निवड जाहीर केली आहे. या निवडी नंतर फुलारी यांना शहरात भाजपा नंबर वन बनविण्यासाठी भाजपा पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान देण्याऱ्या फुलारी यांची शहर अध्यक्षपदी निवड करत विरोधकांना चितपट करण्याचा हा भाजपाचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

तर फुलारी यांच्या निवडीने शहर भाजप व युवा वर्गात एक उस्फुर्त उत्साह असल्याचे दिसून आले. दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांच्या हस्ते फुलारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दोडामार्ग तालुका प्रभारी मंदार कल्याणकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, गटनेते नितीन मणेरीकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस,उपतालुकाध्यक्ष आनंद तळणकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी नगरसेवक संतोष म्हावंळणकर स्वप्नील गवस, सुमित म्हाडगुत, कल्पेश गवस, प्रकाश सावंत, राज बोंद्रे, समीर रेडकर, विशाल चव्हाण दोडामार्ग शहरातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते‌.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # dodamarg # bjp #
Next Article