महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फसगत झालेल्या गुंतवणूकदारांची कागदपत्रे कचऱ्यात

11:36 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तहसीलदार कार्यालयाचा हलगर्जीपणा नडला : गुंतवणूकदारांच्या आशेवर अखेर पाणी

Advertisement

बेळगाव : नेटवर्क मार्केटिंगमध्ये लाखो रुपये गुंतवून फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मिळावी यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु खरोखरच या कागदपत्रांची पूर्तता करून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळणार का? याबाबतची शाश्वती नाही. कारण तहसीलदार कार्यालयातील अनेक कागदपत्र सध्या इतरत्र फेकण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांची नोटरी केलेली कागदपत्रे अशी खुल्यावर फेकण्यात आल्याने तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ समोर आला आहे.

Advertisement

काही वर्षांपूर्वी विविध नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्यांना लाखोंचा गंडा घातला. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी बँकांमधील रक्कम काढून ती नेटवर्क मार्केटिंगमध्ये गुंतवली. भलेमोठे प्रोजेक्ट्स, हॉटेल्स, परदेश दौरे अशी आमिषे दाखवून सर्वसामान्यांचे पैसे एजंटांकरवी गोळा करण्यात आले. परंतु काही दिवसांनी एका मागून एक अशा नेटवर्क मार्केटिंग कंपन्या गाशा गुंडाळून निघून गेल्या. परंतु यामुळे बेळगाव जिल्ह्यातील करोडो रुपये गुंतून पडले.

गुंतवणूकदारांनी कागदपत्रे जमा केली पण पुढे काय?

मध्यंतरी राज्य सरकारने गुंतवणूकदारांना पैसे पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी तहसीलदार कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांनी रक्कम मिळेल या आशेने आपल्याकडे असलेले बाँड, इतर कागदपत्रांचे झेरॉक्स कार्यालयाकडे सुपुर्द केले. तासन्तास रांगांमध्ये उभे राहून नागरिकांनी कागदपत्रे सादर केली. परंतु या कागदपत्रांचे पुढे काय झाले? याविषयी कोणालाच माहिती नाही.

संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडेच लक्ष 

रविवारी बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात कागदपत्रे टाकल्याचे दिसून आले. यामध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांचा समावेश आहे. काहींनी तर नेटवर्क मार्केटिंगचे ओरिजिनल बाँड नोटरी करून कागदपत्रांना जोडले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपले पैसे परत मिळतील या आशेने कार्यालयाकडे कागदपत्रे जमा केली खरी परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कागदपत्रे टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आता कोणती कारवाई होते? हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article