For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉक्टर्सना मिळणार युनिक आयडी नंबर

06:45 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉक्टर्सना मिळणार युनिक आयडी नंबर
Advertisement

‘एनएमसी’पोर्टलवर नोंदणी आवश्यक : डॉक्टरांची संख्या आणि पदव्यांची माहिती मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आता देशातील प्रत्येक डॉक्टरची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना एक युनिक आयडी क्रमांक दिला जाणार आहे. सरकारने सर्व डॉक्टरांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय रजिस्टरमध्ये (एनएमआर) नोंदणी अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेसाठी डॉक्टरांना एमबीबीएस प्रमाणपत्र, नोंदणी आणि आधार कार्ड सादर करावे लागेल. हे पोर्टल नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) तयार केले आहे.

Advertisement

नॅशनल मेडिकल कमिशनने नुकतीच नोटीस जारी केली होती. त्यात इंडियन मेडिकल रजिस्टरमध्ये (आयएमआर) नोंदणीकृत सर्व एमबीबीएस डॉक्टरांना आता नॅशनल मेडिकल रजिस्टर (एनएमआर) मध्येही नोंदणी करावी लागेल. देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये/संस्था आणि राज्य वैद्यकीय परिषदाही या पोर्टलशी जोडल्या जातील.

नोंदणीची प्रक्रिया

पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा आधार ओळखपत्र, एमबीबीएस पदवी प्रमाणपत्राची डिजिटल प्रत आणि स्टेट मेडिकल कौन्सिल/मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून प्राप्त प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल. उर्वरित माहिती स्वत: प्रविष्ट करावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो पडताळणीसाठी संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडे पाठवला जाईल. त्यानंतर राज्य परिषद हा अर्ज संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेकडे पुढील पुनरावलोकनासाठी पाठवेल. पडताळणीनंतर अर्ज राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठवला जाईल. त्यानंतर ‘एनएमसी’ त्याची पडताळणी करून पोर्टलवर सर्व माहिती जारी करेल.

नॅशनल मेडिकल रजिस्टरची गरज का?

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत डॉक्टरांच्या नेमक्या आकडेवारीचा कोणताही डाटा उपलब्ध नव्हता. अंदाजित आकडा सरकारकडे असला तरी आता ह्या नव्या नोंदणीमुळे डॉक्टरांची नेमकी आकडेवारी आता सर्वांना समजेल. याशिवाय किती डॉक्टर देश सोडून गेले. किती डॉक्टरांचे परवाने रद्द झाले? किती डॉक्टरांना जीव गमवावा लागला? ही सर्व माहिती आता एकाच पोर्टलवर दिसणार आहे. पोर्टलवर डॉक्टरांची नोंदणी सुरू झाल्यानंतर त्याचा डेटा सर्वसामान्यांना दिसेल. उर्वरित माहिती नॅशनल मेडिकल कमिशन, स्टेट मेडिकल कौन्सिल, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, एथिक्स अँड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड आणि मेडिकल इन्स्टिट्यूट यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार दृश्यमान असणार आहे.

Advertisement
Tags :

.