महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बहिरेश्वरच्या तरूणाच्या मृत्यु विषयी डॉक्टरांना संशय! गळफास घेवून नाही तर गळा आवळून केल्याबाबतचा डॉक्टरांचा संशय

06:20 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी करण्याबाबतचा घेतला निर्णय; झाडाला गळफास घेवून आत्महत्याबाबतची नातेवाईकांची माहिती
गळफास लावून आत्महत्या केली आहे, असे म्हणत बहेरेश्वर (ता. करवीर) येथील गोरखनाथ वसंत दिंडे (वय 44) या तऊणाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी गुऊवारी दुपारी सीपीआरमध्ये आणला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचमाना कऊन, शवविच्छेदनासाठी पाठविला. याचदरम्यान सीपीआरच्या डॉक्टरांनी दिंडेच्या मृतदेहाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना दिंडेचा घातपात झाल्याबाबतचा संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यावऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. मृत दिंडेच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी सुऊ केली. चौकशीदरम्यान त्यांनी दिंडेने गळफास घेवून आत्महत्या केल्या बाबतची ठाम भूमिका घेतली आहे. तो पर्यंत अंधार पडल्याने दिंडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिंडेच्या मृत्युचे नेमके कारण शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार.

Advertisement

तसेच पोलिसांच्या चौकशीदरम्यान मृत दिंडेच्या नातेवाईकांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून त्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

गोरखनाथ दिंडे यांने सुमारे तीन वर्षापूर्वी फायनान्स कंपनीकडून हजारो ऊपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते त्यांच्याकडून वेळेत भरण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचे कर्ज खाते थकबाकीमध्ये गेले. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांने काही दिवसापासून दिंडेकडे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळल्याने त्यांने गुऊवारी सकाळी घरच्यांना शेतातून जनावरांना चारा घेवून येतो, असे सांगून राहत्या घरातून बाहेर पडला. तो गावालगतच्या तिरकी नावाच्या शेतात आला. त्यांने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

दुपार झाली तरी देखील दिंडे चारा घेवून घराकडे का आला नाही. म्हणनू त्यांच्या भाऊ पांडूरंग दिंडे त्यांच्या शोधासाठी शेताकडे आला. यावेळी त्याला त्यांने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांने या घडल्या प्रकाराची माहिती पोलीस पाटील आणि पोलिसांना दिली. त्यांच्या गळ्याभोवतीचा फास सोडवून, त्याला बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. यांची माहिती सीपीआर पोलीस चौकीत देण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती करवीर पोलीस ठाण्याला सीपीआर पोलीस चौकीतून देण्यात आली. त्यावऊन करवीरचे पोलीस त्वरीत सीपीआरमध्ये आले. त्यांनी पंचनामा कऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या सीपीआरच्या डॉक्टरने शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांना दिंडेने गळफास घेवून आत्महत्या केली नसल्याबाबत संशय आला. याबाबतची त्यांनी माहिती पोलिसांना दिली. त्याचदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील शवविच्छेदन विभागाकडे आले. त्यांनी दिंडेच्या मृत्यु विषयी त्यांच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी त्यांचा घातपात झाला नसून, त्यांने गळफास घेवून आत्महत्या केल्याबाबतचा माहिती बरोबर त्याने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती दिली.

Advertisement
Tags :
bahireshwarDoctors suspectstrangulatedyoung man
Next Article