For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

06:18 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या
Advertisement

दोन अल्पवयीन मुलांकडून केबिनमध्ये घुसून गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील कालिंदी कुंज येथील जैतपूर भागातील नीमा हॉस्पिटलमध्ये एका 55 वषीय डॉक्टरची दोन अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. डॉक्टर जावेद अख्तर असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. ऊग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोरांचे वय 16 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहे.

Advertisement

दोन रुग्णांनी प्रिस्क्रिप्शन घेण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये घुसून गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने सुरुवातीला रुग्णालयात  जाऊन अंगठ्याचे डेसिंग बदलण्यास सांगितले. डेसिंग झाल्यानंतर त्यांनी आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्याचे सांगत डॉक्टर जावेद यांना भेटण्याची अनुमती मिळवली. अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला. त्यानंतर कर्मचारी डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचले असता डॉक्टर जावेद अख्तर यांच्या डोक्मयातून रक्तस्त्राव होत असल्याचे निदर्शनास आले.

गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. हे टार्गेट किलिंगचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा गुन्हे शाखेचे पथक व फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीसाठी आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकार आणि दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर आरोप केले आहेत.

Advertisement
Tags :

.