रुग्णामुळे डॉक्टरला झाला कॅन्सर
शस्त्रक्रियेदरम्यान घडली चूक, पहिल्यांदाच समोर आले असे प्रकरण
कॅन्सर आजाराचे नाव ऐकताच अनेक लोक गर्भगळीत होऊन जातात. हा आजार जगभरात वेगाने वाढत आहे. अशास्थितीत कॅन्सरवरील उपचारात डॉक्टरांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. कॅन्सरचे निदान प्रारंभिक टप्प्यात झाले तर या आजारावर विजय मिळविणे सोपे असते.
एका अनुमानानुसार 2022 मध्ये जगभरात कॅन्सरचे 2 कोटी रुग्ण समोर आले आणि यातील एक कोटी लोकांचा मृत्यू झाला. भारतात दर 1 लाख लोकांमागे कॅन्सरचे 100 रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या अध्ययनानुसार 2020 च्या तुलनेत 2025 मध्ये भारतात कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 13 टक्के वृद्धी होण्याची भीती आहे.
अशा जीवघेण्या आजारावरून जर्मनीत एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे, यात एक डॉक्टरला रुग्णामुळेच कॅन्सर झाला आहे. या घटनेमुळे जगभरात चिंता वाढली आहे, कारण आतापर्यंत कॅन्सरला ट्रान्समिटेड डिसिज म्हणून पाहिले जात नव्हते. सर्जन रुग्णाचा ट्यूमर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत असताना कॅन्सरच्या तावडीत सापडला आहे.
जर्मनीत 32 वर्षीय इसमाला रेयर टाइमचा कॅन्सर होता आणि त्याच्या पोटातून ट्यूमरला बाहेर काढायचे हेत. या शस्त्रक्रियेदरम्यान 53 वर्षीय डॉक्टरच्या हाताला छोटासा कट लागला आणि ही छोटी चूक त्यांना महागात पडली. त्यांनी या घावाला डिसइन्फेक्ट करत त्वरित बँडेज लावले आणि ते निश्चिंत झाले. या शस्त्रक्रियेच्या सुमारे 5 महिन्यांनी डॉक्टरांना बोटावर एक इंचाची गाठ निर्माण झाल्याचे कळले.
डॉक्टर या गाठीवर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांकडे गेले असताना तपासणीत रुग्णाच्या पोटात होता, त्याचप्रकारचा ट्यूमर असल्याचे समोर आले. मग सर्जनला कॅन्सर रुग्णाच्या शस्त्रक्रियेदरम्यान बोटाला झालेल्या ईजेद्वारे कॅन्सर सेल स्वत:च्या शरीरात ट्रान्सफर झाल्याचे उमगले. सर्वसाधारणपणे असे घडत नाही, कारण बाहेरून येणाऱ्या कुठल्याही पेशींना शरीराची इम्युनिटी नष्ट करत असते.
कॅन्सर रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टराची इम्युनिटी कमकुवत राहिल्याने कॅन्सर पेशी त्यांच्या शरीरात दाखल होण्यास यशस्वी राहिल्या. डॉक्टरांना रुग्णामुळे एक रेयर टाइपचा कॅन्सर झाला होता, या प्रकारचे रुग्ण दरवर्षी केवळ 1400 च आढळून येतात असे संशोधन अहवालात म्हटले गेले आहे. संबंधित डॉक्टरने शस्त्रक्रियेद्वारे तो ट्यूमर हटविला आणि त्याला पुन्हा कॅन्सर झाला नाही. तर दुसरीकडे यशस्वी शस्त्रक्रियेच्या काही दिवसांनी रुग्णाला स्वत:चा जीव गमवावा लागला. परंतु या प्रकरणामुळे कॅन्सरसंबंधी असलेल्या धारणेला पूर्णपणे बदलून टाकले आणि याला अधिक धोकादायक आजाराचे स्वरुप दिले आहे.